HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या आठवड्यात बारावीच्या निकालाची तारीख (HSC Result) जाहीर होण्याची शक्यता आहे. सीबीएससी, आयसीएससी बोर्डाचे निकाल लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे.
यंदा दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. बारावी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारावीच्या निकालाची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. थोडक्यात काय तर, Maharashtra State Board कडून परीक्षांच्या निकालांसंबंधीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सात दिवस पुकारलेल्या संपामुळे दहावी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र संप मागे घेतल्यानंतर शिक्षकांनी हे काम प्राधान्याने हाती घेतल्याने दहावी बारावी बोर्ड परीक्षा निकाल वेळेत जाहीर होणार आहे.
15 लाख, 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला पात्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या काळात घेण्यात आली. यंदा राज्यभरातील 15 लाख, 77 हजार 256 विद्यार्थी या परीक्षेला पात्र ठरले. राज्यातील 533 केंद्रांवर परीक्षा पार पडली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावी परीक्षार्थींच्या संख्येत 61 हजार 708 इतकी घट झाली.
14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा
राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण राज्यातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. राज्यभरात 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा पार पडली.
कुठे पाहाल निकाल?
बारावीच्या निकालासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून विविध तारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहान बोर्डाकडून केलं गेलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI