पुणे: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी 1 वाजता जाहीर होत आहे. तत्पूर्वी मंडळाकडून पत्रकारपरिषद घेऊन निकालाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानुसार राज्यात यंदा बारावीच्या परीक्षेला (HSC Results) प्रथमच बसलेले 93.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नेहमीप्रमाणे मुलींनी निकालावर वरचष्मा राखला. तर कोकण विभागात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


बारावीच्या निकालाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:


* महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून पुणे, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती नाशिक, लातूर, कोकण या ९ विभागीय मंडळात राज्यभर परीक्षा घेण्यात आली होती. मराठी, हिंदी, उर्दु, इंग्रजी, गुजराती आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. 


* विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम, आयटीआय या अभ्यासक्रमाच्या एकूण 14 लाख 33 हजार 371 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेचा फॉर्म भरला होता. त्यापैकी 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यामुळे एकूण उत्तीर्णांची टक्केवारी 93.37 टक्के इतकी नोंदवण्यात आली.


* या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४५,४४८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५,०८३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी २२,४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ४९.८२ आहे.


* खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४१,३६२ एवढी असून त्यापैकी ४०,७९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून ३४,९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी ८५.७६ आहे.


* या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७०३२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९८६ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६५८१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९४.२० आहे.


* इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.


* सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.५१ %) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९१.९५ %) आहे.


*  सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल ९५.४४ % असून मुलांचा निकाल ९१.६० % आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८४ % ने जास्त आहे.


कुठे पाहता येणार निकाल?      
        
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org



कसा पाहाल निकाल? 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.
निकाल बघण्यासाठी शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा इतर वेबसाईटचा वापर करता येईल.


संकेतस्थळाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याचं होमपेज ओपन होईल. तेथे महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2024 या ऑप्शनवर क्लिक करा.


या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर तुमचा सीट क्रमांक किंवा परीक्षा क्रमांक टाकण्याचा ऑप्शन दिसेल. काही संकेतस्थळांवर तुम्हाला रोल नंबर किंवा शाळेचा कोड विचारला जाऊ शकतो. विचारण्यात आलेली माहिती भरुन सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI