CUET UG 2022 Result : कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट अंडर ग्रॅज्युएट (CUET UG 2022) परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे 15 सप्टेंबरपर्यंत घोषित केला जाण्याची शक्यता आहे. यूजीसीचे अध्यक्ष ममीडाला जगदीश कुमार (M. Jagdish Kumar) यांनीही निकालाबद्दलची माहिती ट्वीट करत दिली आहे. CUET UG चा निकाल 15 सप्टेंबरपर्यंत जाहीर केला जाईल, असं ट्वीट करत कुमार यांनी सांगितलं आहे. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत साईटला भेट देऊन तपासू शकतात. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार त्यांचे लॉगिन क्रेडेंशियल - रोल नंबर, जन्मतारीख वापरून अधिकृत वेबसाइटवरून त्यांचं स्कोअर कार्ड डाऊनलोड करू शकतील. 


CUET UG 2022 ची उत्तरपत्रिका (Answer Key) जारी केली आहे. उमेदवार 10 सप्टेंबरपर्यंत अधिकृत वेबसाईट cuet.samarth.ac.in वर जाऊन उत्तरपत्रिकेबाबत आक्षेप नोंदवू शकतात. त्यानंतर एनटीएकडून अंतिम उत्तरपत्रिका जाहीर केली जाईल. 






यूजीसी चेअरमननं केलं ट्वीट 


यूजीसीनं चेअरमनन ट्वीट करत म्हटलं की, NTA द्वारे CUET UG चा निकाल 15 सप्टेंबरपर्यंत घोषित केला जाण्याची शक्यता आहे. सर्व सहभागी विद्यापीठं CUET UG स्कोअरच्या आधारे UG प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी त्यांचं वेब पोर्टल तयार ठेऊ शकतात.


11 सप्टेंबर रोजी रिएग्झाम 


CUET UG परीक्षा 15 जुलै ते 30 ऑगस्ट 2022 या कालावधीत 259 शहरं आणि देशाबाहेरील 09 शहरांमध्ये असलेल्या 489 परीक्षा केंद्रांवर सहा टप्प्यांत घेण्यात आली. यावर्षी CUET UG 2022 च्या परीक्षेत 14.90 लाख उमेदवार बसले होते. तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांची 11 सप्टेंबर रोजी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. CUET परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार 011- 40759000 वर कॉल करू शकतात. याशिवाय उमेदवार cuet-ug@nta.ac.in वर ईमेल देखील करू शकतात. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI