CUET PG 2022 Exam Date : CUET UG नंतर आता CUET PG 2022 च्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कॉमन एंट्रन्स युनिव्हर्सिटी टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच CUET PG 2022 परीक्षा सप्टेंबरमध्ये घेतली जाईल. याद्वारे एकूण 66 विद्यापीठांमध्ये पीजी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) चे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी ट्विट करून CUET PG परीक्षेच्या तारखेची माहिती दिली आहे. अधिकृत सूचनेनुसार, CUET PG परीक्षा 2022 NTA द्वारे 1 सप्टेंबर 2022 ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत घेतली जाईल. जाणून घ्या सविस्तर
CUET PG 2022 वेळापत्रक
UGC चे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी @mamidala90 याबाबत ट्विटर हँडलवर माहिती दिली आहे. CUET PG 2022 ची परीक्षा 01, 02, 03, 04, 05, 06, 07, 09, 10 आणि 11 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे चाचणी पेपर कोड, परीक्षेची शिफ्ट आणि वेळ यांचे संपूर्ण तपशील लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहेत. CUET PG अॅडमिट कार्ड 2022 आणि अॅडव्हान्स सिटी स्लिप देखील ऑगस्टच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जारी करण्यात येणार आहेत.
CUET PG परीक्षेला 3.57 लाख विद्यार्थी बसणार
यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार म्हणाले की, या परीक्षेसाठी देशभरातून एकूण 3.57 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या साठी CUET PG परीक्षा भारतातील 500 शहरांमध्ये आणि परदेशातील 13 शहरांमध्ये घेतली जाईल. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतली जाईल. CUET PG मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील केंद्रीय विद्यापीठासह इतर 66 विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर / पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळेल. CUET UG परीक्षा 2022 फेज 2 देखील 04 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याची प्रवेशपत्रे देण्यात आली आहेत. CUET UG फेज 1 ची परीक्षा जुलै 2022 मध्ये घेण्यात आली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI