CISCE Result 2021 Declared: इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स म्हणजेच सीआयएससीई मंडळाचे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल आज दुपारी 3 वाजता जाहीर झाले आहेत. आयसीएसई आणि आयएससी दोन्ही परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापणाद्वारे निकाल तयार करून विद्यार्थ्यांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये आयसीएसई दहावी बोर्डाचा निकाल 100 टक्के तर आयएससी बारावी बोर्डाचा निकाल 99.76 टक्के लागला आहे.


आयसीएसई (ICSE) आणि आयएससीच्या (ISC) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी 'cisce.org' च्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा 'results.cisce.org' वर जाऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. याशिवाय एसएमएसद्वारेही निकाल कळू शकतो. यासाठी, ISC<स्पेस> <Unique Id> लिहा आणि 09248082883 वर पाठवा.


इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) परिषदेचे मुख्य कार्यकारी व सचिव गॅरी आर्थून यांनी काही दिवसांपूर्वीच आयसीएसई इयत्ता 10 वी व आयएससी 12 वीचा निकाल 24 जुलै रोजी दुपारी 3 वाजता जाहीर होणार असल्याचे सांगितले होते. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक प्रविष्ट करुन त्यांचा निकाल तपासू शकतात. वास्तविक, सीबीएसई, सीआयएससीईसह प्रादेशिक मंडळाने कोरोना साथीमुळे बोर्ड परीक्षा रद्द केल्या होत्या.


राज्यात 10 वीचा 100 टक्के निकाल


राज्यातील आयसीएसई मंडळाचे दहावीचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा निकाल 100 टक्के तर बारावीचा निकाल 99.94 टक्के लागला आहे. राज्यात एकूण 24,359 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी 24,358 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावी परीक्षेसाठी 3,427 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 3,425 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 


यंदा राज्यातून सीआयएससीई दहावीसाठी (आयसीएसई) 234 शाळांमधून तर बारावीसाठी (आयएससी) 53 शाळांमधून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दहावीच्या 100% निकालात परीक्षेला बसलेल्या मुलांची आकडेवारी 13 हजार 314 म्हणजेच 54.66% इतकी होती. तर मुलींची टक्केवारी 45.15% होती. म्हणजेच परीक्षेला प्रविष्ट संख्या 11 हजार 45 इतकी होती. आयएससी (बारावी) च्या निकालात प्रविष्ट मुलांची टक्केवारी 48.15% तर मुलींची टक्केवारी 51.85% होती. या परीक्षेला प्रविष्ट मुलामुलींची  संख्या अनुक्रमे 1650 आणि 1777 इतकी आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI