नवी दिल्ली : चीनमध्ये नोकरी करण्याचं अनेक जण स्वपन् पाहतात. तिथ काम करण्याचा फायदा आणि तिथल्या पगाराचं भारतीय रुपयात किती मूल्य होतं ते जाणून घेणार आहोत. विदेशात काम करुन चांगला पगार मिळवायचा असल्यास चीनमधील नोकरी आणि पगाराबाबत जाणून घेणं आवश्यक आहे.
चीनमध्ये काम करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे तिथं चांगला पगार मिळतो. भारताच्या तुलनेत तिथं अनुभवानुसार चांगलं वेतनं मिळतं. चीनमध्ये विविध उद्योग आणि कंपन्या वेगानं वाढत आहेत. तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, शिक्षण क्षेत्रात तिथं मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होत आहेत.
चीनमध्ये नोकरी करण्याचा एक फायदा म्हणजे तिथं काम करणाऱ्या व्यक्तीचा अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानला जातो. चीनमध्ये काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या देशांसोबत काम करण्यास शिकवलं जातं.त्यामुळं कर्मचाऱ्यांचं करिअर पुढं जातं आणि त्यांना नवी कौशल्य शिकण्याची संधी मिळते.
भाषा आणि संस्कृती संदर्भात देखील चीनमंध्ये काम करण्यास शिकणं चांगला अनुभव असतो. चीनची संस्कृती आणि जीवनशैली जाणून घेण्याची संधी मिळते. तिथं नोकरीसह जीवन जगण्याचा अनुभव देखील मिळतो. काही कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण देतात. त्यामुळं त्यांचं कौशल्य आणखी वाढतं.
दरम्यान, चीनममध्ये काम करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. चिनी भाषा आणि नियमांची माहिती असल्यास फायदा मिळतो. जीवनशैली आणि खर्चांची तुलना आवस्यक आहे. चीनमध्ये राहून खर्च करणं भारताच्या तुलनेत वेगळं असतं. मात्र चांगला पगार आणि अनुभव मिळत असेल तर चीनमधील नोकरी फायदेशीर ठरु शकते.
चीनच्या चलनाचं मूल्य किती?
भारताचं चलनं जसं रुपया आहे तसं चीनचं चलन युआन आहे. 1 यूआनचं मूल्य 12.81 भारतीय रुपये इतकं आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला चीनमध्ये 100000 युआन पगार मिळत असेल तर भारतीय रुपयात त्याचं मल्य 1281000 इतकं आहे. भारतीय कंपन्यांच्या तुलनेत सुरुवातीला हा चांगला पगार मानला जाईल. त्यामुळं काही जण चीनमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI