CBSE Class 10th Result 2026 Out नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच सीबीएसईनं दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 चा निकाल 93.70 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी सीबीएसईच्या दहावीचा निकाल 93.66 टक्के होता, त्या तुलनेत यंदा निकालात सुधारणा झाली आहे. बोर्डानं यावेळी उत्तरपत्रिकांची तपासणी विक्रमी वेळेत पूर्ण करत निकाल दरवर्षीच्या तुलनेत एक महिना अगोदर जाहीर केला आहे.  

Continues below advertisement

मुलींनी मारली बाजी

दरवर्षीप्रमाणं यंदा देखील सीबीएसईच्या दहावीच्या निकालात मुलींनी मुलांना मागं टाकत बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची टक्केवारी अधिक आहे. सीबीएसईनं अधिकृतपणे टॉपर यादी जाहीर केली नाही. मात्र, गुणवत्ता प्रमाणापत्र त्या त्या विषयात अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. सीबीएसईनं दहावीचा निकाल जाहीर केल्यानं जवळपास 24 लाख 75 हजार विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. 

डिजीलॉकर आणि उमंग एपवर वेगवान निकाल

सीबीएसईच्या वेबसाईटवर अधिक विद्यार्थी भेट देत असल्यानं डिजीलॉकर आणि उमंग एपद्वारे विद्यार्थी तातडीनं निकाल डाऊनलोड करु शकतात. उमंग एपवरील निकालाची  सर्वप्रथम सक्रीय करण्यात आली. 

Continues below advertisement

निकाल कसा पाहायचा?

सर्वप्रथम सीबीएसईची अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in ला भेट द्या.होमपेज वर 'Secondary School Examination (Class X) 2026' लिंक वर क्लिक करा.तुमचा रोल नंबर, शाळेचा नंबर आणि प्रवेशपत्र आयडी नोंदवा.यानंतर तुम्ही सबमिट बटनवर क्लिक करा, तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. निकाल डाऊनलोड करुन प्रिंट काढून घ्या.

दुसऱ्या परीक्षेची संधी

सीबीएसईनं दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला असला तरीज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत अपयश आलं आहे. ते दुसऱ्या परीक्षेसाठी अर्ज दाखल करु शकतात. याशिवाय जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत मिळालेल्या गुणांमुळं समाधानी नाहीत ते 15 मेपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. सीबीएसईकडून लवकरच दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी अर्ज मागवले जाणार आहेत. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार सीबीएसईनं दोन बोर्ड परीक्षा पद्धत आणली आहे. 

सीबीएसईच्या विभागनिहाय निकालात त्रिवेंद्रम आणि विजयवाडा विभागानं बाजी मारली आहे. दोन्ही विभागांचा निकाल 99.79 टक्के लागला आहे. तर, नोएडा विभागाचा निकाल 87.66 टक्के तर दिल्ली विभागाचा निकाल 97.38 टक्के लागला आहे.  केंद्रीय विद्यालयांचा निकाल 99.57 टक्के लागला असून जवाहर नवोदय विद्यालयांचा निकाल 99.42 टक्के निकाल लागला आहे. तर, सरकारी शाळांची टक्केवारी 91.43 टक्के आहे.    दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणारे विद्यार्थी :  24,71,777उत्तीर्ण विद्यार्थी संख्या : 23,16,008निकालाची टक्केवारी : 93.70%परीक्षा कालावधी : 17 फेब्रुवारी ते10 मार्च 2026


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI