CBSE Extends Last Date To Upload Internal Assessment Marks of Class 10th & 12th Students : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (CBSE) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण (CBSE Class 10th & 12th Students) अपलोड करण्यासाठी शाळांना अतिरिक्त वेळ दिला आहे. दरम्यान, अनेक शाळांकडून इंटर्नल मार्क्स देण्यासाठी आणखी काही वेळ द्यावा, अशा विनंत्या सातत्यानं सीबीएसईकडे येत होत्या. बोर्डानं निश्चित केलेल्या शेवटच्या तारखेत अनेक शाळांना (CBSE Board Schools) अंतर्गत गुण (CBSE Board Schools Internal Marks) देण्याचे काम पूर्ण करता आले नाही.


या परीक्षांचे गुण द्यायचे आहेत


CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वी आणि 12वी अंतर्गत मूल्यमापन गुण दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अनेक विषयांमध्ये दिले जातात. किंबहुना, त्यांना प्रोजेक्ट वर्क, प्रात्यक्षिक परीक्षेची टर्म एक आणि टर्म दोन, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देखील दिले जातात. सर्व आधारावर अंतिम स्कोअर केलं जातं.


ही होती शेवटची तारीख 


शाळांना सर्वात आधी प्रोजेक्ट्स, इंटर्नल एसेस्मेंट आणि प्रॅक्टिकल एग्जाम इत्यादींची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी शाळांना यापूर्वी 2 मार्चपर्यंत वेळ देण्यात आला होता. त्यांची अंतिम तारीख संबंधित वर्गाच्या शेवटच्या परीक्षेच्या तारखेच्या 10 दिवस आधीची होती.


CBSE बोर्डाचं म्हणणं काय? 


बोर्डाने शेवटच्या तारखेनुसार, गुण देण्यासाठी पोर्टल डिअॅक्टिव्हेट केलं होतं. मात्र, नंतर बोर्डाच्या निदर्शनास आलं की, दहावीच्या 39 शाळा टर्म एक आणि 537 शाळा टर्म टूमध्ये गुण मिळवू शकल्या नाहीत.


त्याचप्रमाणे इयत्ता बारावीमध्ये 141 शाळा पहिल्या टर्ममध्ये आणि 185 शाळा टर्म टूमध्ये गुण मिळवू शकल्या नाहीत. हे लक्षात घेऊन, बोर्डानं दहावीसाठी अंतर्गत गुण जमा करण्याची अंतिम तारीख 31 मे 2022 आणि इयत्ता बारावीसाठी 5 जून 2022 पर्यंत वाढवली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


​​CBSE 10th 12th Board Exam Pattern : आता विद्यार्थ्यांना घोकमपट्टी करुन परीक्षा देता येणार नाही, CBSE कडून परीक्षा पद्धतीत बदल


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI