CBSE 10th Result 2021 : CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. काही दिवसांपासून सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासूनच दहावीचा निकाल कधी जाहीर होणार यासंदर्भात उत्सुकता होती. अशातच आज सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन आज दुपारी निकाल जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in, cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. जाणून घ्या कुठे आणि कसा पाहाल निकाल..?


सीबीएसई दहावी बोर्ड निकाल एकूण निकाल : 99.04 टक्के
उत्तीर्ण मुलांचा निकाल : 98.89 टक्के
उत्तीर्ण मुलींचा निकाल : 99.24 टक्के


पुणे विभागाचा निकाल : 99.92 टक्के


देशात 90 ते 95 टक्के दरम्यान गुण मिळलले विद्यार्थी : 200962 (9.28टक्के)


देशभरात 95 टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी : 57824 (2.76 टक्के)


सीबीएसई दहावीचा निकाल कसा पाहाल :



  • सर्वात आधी अधिकृत वेबसाईट  cbseresult.nic.in किंवा cbse.nic.in वर जा

  • पुढच्या पानावर क्लिक करा आणि आपले एग्साम डिटेल्स एंटर करा. जसं की, रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ 

  • डिटेल्स सबमिट केल्यानंतर दहावीचा रिझल्ट 2021 चेक करा 

  • तुमचा रिझल्ट स्क्रिनवर येईल

  • रिझल्ट डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेऊन ठेवा

  • सीबीएसई दहावीचा परिणाम अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त डिजिलॉकरवरही उपलब्ध होईल. विद्यार्थी इथेही आपला रिझल्ट चेक करु शकतील. 


सीबीएसई बारावीचा निकाल 99.37 टक्के


सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेवसाईटवर म्हणजे cbseresults.nic.in  वर हा निकाल पाहता येईल. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता असून बोर्डने अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.  सीबीएसई 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 99.37 टक्के लागला आहे. या निकालात नेहमीप्रमाणं मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 99.67 टक्के तर मुलांचा निकाल 99.13 टक्के लागला आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI