मुंबई : एआयसीटीई (AICTE) चं चालू शैक्षमिक वर्षाचं वेळापत्रक तयार झाले असून सुधारित वेळापत्रकानुसार इंजिनियरिंग प्रथम वर्ष प्रवेश 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इंजिनियरिंग प्रथम वर्ष कॉलेजचे वर्ग 1 डिसेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. AICTE ने देशातील AICTE मान्यता प्राप्त संस्थांसाठी सुधारित शैक्षणिक वर्ष 2020-2021 चे वार्षिक वेळापत्रक जाहीर केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यतून मागणी झाल्यानंतर आयआयटी, एनआयटी त्यासोबतच AICTE मान्यता प्राप्त इंजिनियरिंग कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या त्यासोबतच इंजिनियरिंग डिप्लोमा प्रवेशाची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर करण्यात आली आहे. तर देशभरात AICTE मान्यता प्राप्त कॉलेजमध्ये इंजिनिरिंगचे वर्ग 1 डिसेंबर पासून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

NEET Exam Result 2020 : ओडिशाच्या शोएब आफताबने रचला इतिहास! नीट परीक्षेत 720 पैकी 720

AICTE च्या सुचनेनंतर महाराष्ट्रातील सीईटी परीक्षा झाल्यानंतर व निकाल जाहिर झाल्यानंतर नोव्हेंबर अखेरीस प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून 1 डिसेंबरपासून इंजिनियरिंग कॉलेज सुरू करण्याचे नियोजन उच्च व तंत्रशिक्षण विभागाला करावयाचे आहे. ऑनलाइन, ऑफलाइन पर्यायांनी सर्व गाईडलाइन्सचा अवलंब करून क्लासेस, कॉलेजेस सुरू करावेत, अशा सूचना AICTE कडून देण्यात आल्या आहेत.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI