Ahilyanagar News : जिद्द, प्रामाणिककष्टआणि सातत्याचाजोरावरस्वप्नसत्यातउतरवतायेतं, याच मुर्तिमंत उदाहरण श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव (Ukhalgaon)  यालहानश्यागावातूनसमोरआलंआहे. एरवी गाव खेड्यातील विद्यार्थ्यांचे यश हे अनेकांसाठी प्रेरणा देऊन जाणारे असते. अशाच पद्धतीने अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील चंदन कुटुंबातील तिघा भावांनी एमपीएससी उत्तीर्ण होत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि उखलगाव सारख्या दुर्गम भागातील अजय, मालन, चंदन यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केलीये. यात सर्वात मोठा भाऊ दिलीप मालन चंदन हा पोलीस निरीक्षक झालाय. तर दुसरा भाऊ विजय मालन चंदन हा सहा.पोलीस निरीक्षक झालाआहे. तरहीचपरंपराकायमठेवत नुकतेच राज्यकर निरीक्षक म्हणून अजय मालन चंदन नियुक्त झाले आहे. अहिल्यानगरच्या (Ahilyanagar)  श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील या तीन सख्ख्या भावांच्या एमपीएससी परीक्षेतीलघवीतयशानेसर्वस्थरातूनकौतुककेलंजातआहे.

Continues below advertisement

Ahilyanagar Success Story : प्रेरणादायी! 3 सख्ख्या भावांचं एमपीएससी परीक्षेतील घवघवीत यशा

चंदन कुटुंबातील तिघा भावांनी एमपीएससी उत्तीर्ण होत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सोबतचपरिस्थितीतुमच्याअपयशाचेकारणठरूशकतनाही, हेदेखीलसिद्धकेलंआहे. यात चंदन कुटुंबातीलमोठा भाऊ दिलीप मालन चंदन हे नागपूर गुन्हे शाखा येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तर दुसरा भाऊ विजय मालन चंदन हे पुणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर तिसरे भाऊ विनोद चंदन हे बांधकाम व्यावसायिक असतानात्यांनीजिद्दीच्याजोरावरआणिमेहनतीवरयशालागवसणीघातलीआहे. दोघा भावांपासूनप्रेरणाघेत अजय चंदन यांनीस्पर्धापरीक्षेचीतयारीसुरुकेलीआणित्यातयशमिळवत राज्यकर निरीक्षक म्हणून अजय चंदन नियुक्त झाले आहे.

Continues below advertisement

दुर्गम गावातून थेट अधिकारीपदापर्यंतचा प्रवास (MPSC Success Story)

श्रीगोंदा तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात राहून आणि तेथीलच जिल्हा परिषद शाळेत शिकून अजय चंदन यांनी राज्य कर निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील तिघा भावांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे. अजय चंदन यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथ.शाळा उखलगाव येथून घेतले. पुढे समाजशास्त्र या विषयात आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. दोन मोठ्या भावांचा आदर्श घेत अजय यानेही एमपीएससी परीक्षेचा ध्यास धरला आणि त्यात यश मिळवले.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त गट ब 2024 मध्ये राज्य कर निरीक्षक (एसटीआय) पदी निवड झाली. त्याने केडगाव, अहिल्यानगर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी केली अजयचे मोठे बंधू दिलीप मालन चंदन यांची एमपीएससीच्या माध्यमातून 2010 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली होती, ते सुरुवातीला शिक्षक होते. दुसरे बंधु विजय मालन चंदन यांची 2012 सा पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. तेही सुरुवातीला शिक्षक होते. मात्र एमपीएससी परीक्षेने दोन्ही भावांना स्वस्त बसू देत नसल्याने दोघांनीही त्याची तयारी केली आणि मोठ्या पदावर जाण्याचा निर्णय घेत अखेर एमपीएससी गाठले. आणि आता त्यांच्या पाठोपाठ अजय चंदन यांनी देखील एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

MPSC Success Story : तीन सख्खे भाऊ अधिकारी झाल्याची प्रेरणा; 15 जणांनी केली एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण

विशेष म्हणजे दिलीप चंदन हे अधिकारी झाल्यानंतर उखलगाव येथे त्यांचे प्रेरणा घेत जवळपास 15 जणांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे ग्रामस्थ सांगतात. तीन सख्खे भाऊ एमपीएससीच्या माध्यमातून अधिकारी होणे हे दुर्मिळ आणि प्रेरणादायी उदाहरण आहे. या यशामागे माझी आई, भाऊ कुटुंब आणि मित्र यांचा खूप मोलाचा वाटा आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत सातत्य, जिद्द आणि चिकाटी खूप महत्वाची आहे. तसेच वेळेचा सदुपयोग आणि योग्य नियोजन करूनच स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते त्यातच केवळ मिळालेले यश स्वतःपुरते न ठेवता गावातील इतरही मुलांना हे तिघे सख्खे भाऊ प्रेरणा देत आहेत. अजयमध्ये अधिकारी होण्याची क्षमता असल्याचे आम्हा भावांना समजले होते. त्यानंतर आम्ही त्याला मार्गदर्शन केले आणि त्याने देखील कष्टाचे चीज करून दाखवले त्यामुळे आमच्या आईला देखील प्रचंड आनंद झाल्याची प्रतिक्रिया अजय चंदन यांचे बंधू पोलीस निरीक्षक दिलीप चंदन यांनी दिली आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI