पुणे : कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी उद्यापासून बारावीच्या निकालानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची सीईटी नसून नेहमीप्रमाणेच मेरीटलीस्टनुसार प्रवेश होणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली. पुढील शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून आम्ही आठ दिवसांत निर्णय घेणार आहोत. त्यासाठी प्रशासनाशी आम्ही चर्चा करत असल्याचीही त्यांनी माहिती दिली.


उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे 



  • यंदा तेरा लाख नऊशे बासष्ठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीपेक्षा तेहतीस हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

  • कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे प्रवेश बारावीच्या निकालानुसारच होणार. या संदर्भात आज कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यात सर्व कुलगुरूंचे एकमत झाले आहे. त्यासाठी तुकड्या वाढवून हव्या असतील तर 31 तारखेपर्यंत अर्ज करावा.

  • कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या संपुर्ण शिक्षणाचा खर्च विद्यापीठ करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. 

  • प्रोफेशनल कोर्ससाठी 26 ऑगस्ट 2021 पासून सीईटीची प्रक्रिया सुरु होईल. मात्र, या तारखा आम्ही संबंधित यंत्रणांशी बोलून नक्की करणार आहोत.

  • मागील वर्षी ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी नव्हती त्या अभ्यासक्रमांना यावेळेस देखील सीईटी नसेल.

  • राज्याच्या वित्त विभागाकडून होकार मिळाला की प्राध्यापकांची भरती केली जाईल.

  • सीईटी परिक्षा या ऑनलाईन होतील. पण त्या सेंटरवर जाऊन द्याव्या लागतील. घरातून देता येणार नाहीत. त्यासाठी सीईटीची सेंटर्स वाढवण्याचा आमचा विचार आहे. शासन आणि विद्यापीठ एकत्र चालली पाहिजेत.

  • राज्यपालांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आढावा घेणं हा त्या पदाचा कमीपणा आहे. राज्यपाल जिल्हाधिकाऱ्यांना राजभवनावर बोलावू शकतात. म्हणूनच त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात बदल केल्याचे समजते आहे.


 


सीईटी परीक्षा पुढीलप्रमाणे होतील : - 
26 ऑगस्टपासून होणाऱ्या सीईटी 
1.एम बी ए- 
2.एम सी एम
3. आर्किटेक्चर 
4. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट 
5. मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट 
6. बी एड. 
7. एल एल बी.


इंजिनियरिंगसाठी सीईटी दोन सत्रात होतील
पहिले सत्र 14 सप्टेंबर 
दुसरे सत्र 19 सप्टेंबरपासून पुढे.
या तारखा संभाव्या असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI