एक्स्प्लोर

Yusuf Pathan Crime: मोठी बातमी: युसूफ पठाणच्या सासऱ्यांना मारहाणप्रकरणात जामीन मंजूर

Yusuf Pathan Crime: भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याच्या सासऱ्यांना मुंबई पोलिसांनी एका मारहाणप्रकरणात अटक केली होती. त्यांना न्यायालयाने जामिनावर सोडले आहे.

Yusuf Pathan Crime: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचा (TMC) खासदार युसुफ पठाण यांच्या सासऱ्यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर  करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणी प्रकरणी युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांचे सासरे खालीद खान आणि मेहुण्याला भायखळा पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातीला झालेल्या वादात खालिद खान (Khalid Khan) हजर नव्हते. तसेच या घटनेत जखमी झालेल्या तक्रारदाराला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून खालिद खान यांच्याकडून काही जप्त करणे बाकी नसल्याचे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर करताना म्हटले. (Mumbai Crime news)

18 एप्रिलला भायखळा परिसरात रस्त्यावर साचलेल पाणी अंगावर उडाल्याच्या रागात कार चालक आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली होती. यावेळी मारहाणीची तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात जाणाऱ्या तक्रारदाराला खालिद खान आणि इतरांनी मारल्याचा आरोप आहे. मारहाणीत तक्रारदार युसूफ खान याचा मेहुणा सलमान याचा हात फ्रॅक्चर झाला होता. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी दोन्ही बाजूंविरोधात क्रॉस एफआयआर दाखल केला होता.

नेमकं प्रकरण काय? (Yusuf Pathan Farher In Law Case)

सदर प्रकरणातील तक्रारदाराच्या कारने रस्त्यावर साचलेलं पाणी अंगावर उडाल्याने वाद झाला आणि त्याची परिणीती मारहाणीत झाली. कारमुळे अंगावर पाणी उडाल्याने युसूफ खान नावाच्या व्यक्तीला युसूफ पठाणचा मेहूणा शोएब खानकडून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करायला जात असलेल्या युसुफ खानला युसुफ पठाणचे सासरे खालिद खान आणि त्यांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याचा आरोप युसुफ खानने केला आहे. यावेळी बांबू आणि बेसबॉल बॅटने मारहाण केल्याचा आरोप आहे. यात त्याचा हात देखील फ्रॅक्चर झाला आहे. भायखळा परिसरात शनिवारी रात्री घटना घडली होती. युसूफ पठाण यांच्या सासऱ्यांसह मेहुणा अशा एकूण तिघांना 2 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Yusuf Pathan Farher In Law Case)

Mumbai Police News: पोलिसांनी काय सांगितलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफ पठाणचा सासरा खालिद खान आणि त्यांचे मुलं उमरशाद आणि शोएब, तसेच आणखी एक आरोपी शाहबाज पठाण यांनी युसूफ खानशी वाद घातला. तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी बेसबॉल बॅट्स आणि बांबूच्या काठ्यांचा वापर करून युसूफ खानला मारहाण केली. पोलिसांनी सांगितले की, शाहबाज खान सध्या फरार आहे, तर उर्वरित तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असून, न्यायालयाने त्यांना 2 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली असून, या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

आणखी वाचा

Watermelon Death Case Mumbai: विषबाधामुळे मृत्यू नव्हे...कलिंगड खाऊन मृत्यू प्रकरणी सर्वात मोठी माहिती, 4 जणांच्या मृत्यूचं कारण काय?

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
Rohini Khadse : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला पोलिसांची व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहिणी खडसेंचा खळबळजनक आरोप, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही सुनावलं
अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला पोलिसांची व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहिणी खडसे यांचा खळबळजनक आरोप, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही सुनावलं
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Beed : भररस्त्यात तरुणीनं थोबाडीत मारली, अपमान सहन न झाल्याने तरुणानं जीवन संपवलं; बीडमधील धक्कादायक घटना
भररस्त्यात तरुणीनं थोबाडीत मारली, अपमान सहन न झाल्याने तरुणानं जीवन संपवलं; बीडमधील धक्कादायक घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohini Khadse : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला पोलिसांची व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहिणी खडसेंचा खळबळजनक आरोप, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही सुनावलं
अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला पोलिसांची व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहिणी खडसे यांचा खळबळजनक आरोप, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही सुनावलं
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Rohit Pawar: दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Embed widget