Nagpur Crime News: नागपूरच्या आमदार निवास परिसरात तरूणाला संपवलं, मध्यरात्री घडली घटना, जुन्या वादातून घटना घडल्याचा संशय; मृतक रेकॉर्डवरचा गुन्हेगार
Nagpur Crime News: मृतक आकाश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार होता. जुन्या वादाचा राग मनात ठेवून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

नागपूर: उपराजधानी नागपूरमधील हायप्रोफाईल मानल्या जाणाऱ्या आमदार निवास परिसरात एका पंचवीस वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस (Nagpur Crime News) आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आकाश सुरेश नेवारे (वय २५, रा. तेलंगखेडी, नागपूर) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्री उशिरा घडली. मृतक आकाश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार होता. जुन्या वादाचा राग मनात ठेवून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.(Nagpur Crime News)
या प्रकरणातील संशयित आरोपीसुद्धा रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असून अंबाझरी पोलीस पुढील तपास करत आहेत.(Nagpur Crime News)
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या आमदार निवास परिसरात ही हत्या करण्यात आली आहे, रात्री उशिरा हि घटना पुढे आली. आकाश सुरेश नेवारे असे मृतकाचे नाव असून वय पंचवीस वर्षे आहे. मृतक नागपूरच्या तेलंगखेडी भागात राहत होता. तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार होता. जुन्या वादातून हि हत्या झाल्याचा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे. संशयित आरोपी देखील रेकॉर्डवरचे गुन्हेगार असून अंबाझरी पोलीस पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.(Nagpur Crime News)






















