Yavatmal News : उर्दू शाळेच्या स्नेहसंमेलनात चक्क पाकिस्तानी देशभक्तीगीतावर नृत्य; भाजप नगरसेवकाची तक्रार, मुख्याध्यापक अन् शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
Yavatmal News : यवतमाळच्या उमरखेड येथील अब्दुल गफूर शाह नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक-2 मध्ये आयोजित स्नेहसंमेलनात(Gathering) चक्क पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर गायन आणि नृत्य करण्यात आल्याची घटना घडलीय.

Yavatmal News : यवतमाळच्या उमरखेड (Umarkhed) येथील अब्दुल गफूर शाह नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक-2 मध्ये आयोजित स्नेहसंमेलनात (School Annual Gathering) चक्क पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर गायन आणि नृत्य करण्यात आल्याची घटना घडलीय. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी हा प्रकार घडला असून या प्रकरणी भाजपचे (BJP) नगरसेवक गोपाळ कलाने यांनी उमरखेड पोलिसांत (Umarkhed Police) तक्रार दाखल केली आहे. त्यावरून उमरखेड पोलिसांनी (Yavatmal Police) मुख्याध्यापक आणि एका शिक्षका विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 196 (1)(c) नुसार गुन्हे दाखल केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक संचार उल्ला खान अब्दुल खान, शिक्षक मोहम्मद फिरोज आशा जी अशी गुन्हे दाखल झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. या स्नेहसंमेलनात "ये मर्द ये मुजाहिद, तेरी अल्गार क्या है" हे गाणे गायले गेले आणि त्यावर नृत्य करण्यात आले. हे गाणे पाकिस्तानसाठी लष्करी स्फूर्तीगीत म्हणून ओळखले जाते, जे देशभक्तीचा भाव जागृत करणारे आहे.
Yavatmal News : भाजप नगरसेवकाची तक्रार, मुख्याध्यापक आणि शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान भाजप नगरसेवक गोपाळ कलाने यांनी तक्रारीत म्हटले आहे की, शाळेच्या कार्यक्रमात अशा प्रकारचे पाकिस्तानी गाणे गायन आणि नृत्य करणे हे अनेकाच्या भावना दुखावणारे आणि देशद्रोही आहे. भाजप नेत्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हे स्नेहसंमेलन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी होते. यामुळे स्थानिक पातळीवरून निषेधाची लाट उसळली असून, सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा होत आहे. उमरखेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू केला आहे.
Bhandara : ड्रंक अँड ड्राईव्हनं घेतला सेवानिवृत्त शिक्षकाचा बळी; भंडाऱ्याच्या ब्रह्मी येथील घटना
ड्रंक अँड ड्राईव्ह करताना एका कारचालकानं दिलेल्या धडकेत सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील ब्रह्मणी इथं घडली. राजहंस रामटेके (६०) असं कारच्या धडकेत मृत सेवानिवृत्त शिक्षकांचं नावं आहे. मृत राजहंस हे रात्रीला जेवणानंतर पत्नीसह घरासमोर शतपावली करीत होते. यावेळी भरधाव आणि मद्यधुंद असलेल्या कार चालकांनं त्यांना धडक दिली, यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त कार अडवून कार चालकाला चोप देत पवनी पोलिसांच्या स्वाधीन केलं. याप्रकरणी मद्यधुंद कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























