यवतमाळ : बाप आपल्या मुलीच्या (Girl) सुखासाठीही काहीही करतो, कष्ट करतो, धडपड करतो, अखेर तिच्या हट्टापायी तिच्या आवडत्या मुलासोबत तिचे लग्नही लाऊन देतो. आपली मुलगी सुखाने नांदावी, सुखी संसारात राहावी यासाठी जावयाचेही लाड पुरवत असतो. मात्र, जावई मुलीला त्रास देत असल्याचे समजताच टोकाचे पाऊलही उचलतो, हेच नेर तालुक्यातील घटनेतून समोर आलं आहे. मुलीचा प्रेम विवाह मान्य करूनही जावई मुलीला त्रास देतोय, मुलीला मारहाण व छळ करीत असल्याने यवतमाळच्या (Yavatmal) नेर तालुक्यातील कोलुरा येथे सासऱ्याने जावयाची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून (Police) अधिक तपास सुरू आहे. 

Continues below advertisement

शंकर मसाराम मस्के (35, रा. कुंभारी, ता. पुसद) असे मृत जावयाचे नाव आहे. तर रामनाथ किसन कवडे (60) असे आरोपीचे नाव असून नेर पोलिसांनी त्याला अटक केली. जावई हा दारूच्या नशेत सतत मुलीला मारहाण व छळ करीत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये सातत्याने वाद होत होते. त्यातूनच राग अनावर झाल्यानंतर सासऱ्याने चक्क जावयाला संपवले. 

मृत जावई शंकरची पत्नी माहेरी कोलुरा येथे वडिलांच्या घरी होती. त्यामुळे शंकर पत्नीला समजून सांगण्यासाठी कोलुरा येथे आला होता. दरम्यान सकाळी कोलुरा येथील मंदिराजवळ सासरे रामनाथ कवडे आणि जावई शंकर मस्के या दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात रामनाथ कवडे यांनी कुन्हाडीने शंकरच्या गळ्यावर, मानेवर व पाठीवर वार केले. यात शंकरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास नेर पोलीस ठाणे करत आहेत. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून फॉरेन्सिक पथकानेही तपासणी केली आहे. 

Continues below advertisement

रायगडमध्ये दारुच्या नशेत खून

रायगड जिल्ह्याच्या खोपोली येथील पाली फाटा परिसरात दारूच्या नशेत दोन कामगारांमध्ये झालेल्या भांडणाचे रुपांतरण थेट मारहाणीत झाले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत दिनेश कुशवाह या कामगाराच्या डोक्यात रामसहाय पाल याने लाकडी दांडका टाकल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिनेश कुशवाहचा जागीच मृत्यू झाला. खोपोलीमधील पाली फाटा परिसरातील जे.पी.पॅलेस समोर ही घटना घडली असून खोपोली पोलिसांनी घटनेची माहिती घेत आरोपी रामसहाय पाल याला अटक केली आहे. खोपोलीमधील निमासो कंपनीत हे दोघेही कामाला होते. मात्र, अंतर्गत वाद झाल्याने दोघांमध्ये हाणामारी झाली आणि यामध्ये दिनेश कुशवाह याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यातच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा

Ravindra Dhangekar Khalil Shaikh Pune News: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी जीवन संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्याआधी काय काय म्हणाले?