Yavatmal Crime News : जुन्या वादातून एका सात वर्षीय चिमुकलीची हत्या (Yavatmal Crime) करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना यवतमाळच्या दारव्हा (Darwha Crime) तालुक्यातील बोथ गावातघडल्याचे उघडकीस आलंय. पोलीसतपासातघराशेजारीच राहणाऱ्या जाधव कुटुंबियातील सदस्यांनी तिचे अपहरण करून हत्या (Crime) केल्याचे समोर आले आहे. तसेच चिमुकलीच्या नाकातील सोन्याचा दागिना गहाळ झाल्याचे यावेळी दिसून आले. त्या दिशेने पोलीस तपास करीत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिली. तसेच या प्रकरणात असलेल्या चार जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्रयाघटनेनंयवतमाळजिल्ह्यातील दारव्हा हादरलंआहे.
Yavatmal Crime News : शेजारचेच निघाले मारेकरी, घराची झाडाझडतीतपोत्यातमृतदेहआढळला
मिळालेल्यामाहितीनुसार, घटनेतीलमृत चिमुकली 20 मार्चपासून घरून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दारव्हा पोलिसात दाखल केली होती. त्यावरून 21 मार्चला जिल्हा पोलीस अधीक्षक हे पथकासह बोथ गावात दाखल झाले आणि त्यांनी गावात शोध मोहीम सुरू केली. दरम्यान यावेळी चिमुकलीच्या घराशेजारी राहणाऱ्या कैलास जाधव यांची चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यावरून पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता चिमुकलीचा मृतदेह एका पोत्यात घरामध्ये आढळून आला. त्यावेळी पोलिसांनी कैलास जाधव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनीच हत्या केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी कैलास विलास जाधव, माला विलास जाधव, सोनी विलास जाधव, रंजना सोनू जाधव, यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मात्रया घटनेनंपरिसरातमोठीखळबळउडालीआहे.
Akola Crime : अकोल्यात बेपत्ता 11 वर्षीय मुलाचा मृतदेह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्याच्या नाल्यात आढळला
अकोल्यात चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 11 वर्षीय मुलाचा मृतदेह आज सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तर सर्वज्ञ निलेश निंबाळकर असे मृत मुलाचे नाव असून त्याचा मृतदेह पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील नाल्यात आढळून आला आहे. तर 19 मार्च रोजी घरातून बाहेर पडलेल्या सर्वज्ञचा शोध कुटुंबीय आणि पोलिसांकडून सुरू होता. तर एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर शोधमोहीम राबवण्यात येत होती. दरम्यान आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर पुढील तपास MIDC पोलीस करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
