Yavatmal Crime News : यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील यावली गावातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात जुने घर बहिणीच्या नावे का केले? ते घर माझ्या नावाने करून द्या, याकरिता वाद घालत दारूच्या नशेत असलेल्या मुलाने आपल्या जन्मदात्यांना जबर मारहाण (Crime News) केली आहे. या मारहाणीत आई आणि वडिलांवर लोखंडी फावड्याने हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली असून डोळ्यादेखत आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी वडिलांवर यवतमाळ (Yavatmal) येथे रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना काल (17 जुलै) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने सर्वत्र एकाच खळबळ उडाली असून पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
मुलगा दारू पितो म्हणून मुलीच्या नावे घर केलं, संतापलेल्या पोरानं आईला संपवलं
पुढे आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुलगा जितेंद्र डेबुर असे आरोपी मुलाचे नाव आहे. तर पार्वताबाई डेबुर असे मृत आईचे नाव आहे. तर वडील महादेव डेबूर यांच्यावर सध्या यवतमाळ येथे रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपीला तीन बहिणी असून गावात वडिलांच्या नावे असलेले जुने घर वडिलांनी मुलगा दारू पितो म्हणून मुलीच्या नावे करून दिले. याच कारणावरून आरोपी आणि त्याची पत्नी आई-वडिलांशी नेहमी वाद घालायची. दरम्यान याच कारणावरून कुटुंबात कायम वाद होत असे. असाच वाद काल (17 जुलै) रात्री उफाळून आला आणि वादाचे रूपांतर टोकाला जात ही गंभीर घटना घडली. या प्रकरणी बाभुळगाव पोलिसांनी आरोपी जितेंद्र डेबूर व त्याची पत्नी सुशीला डेबूर दोघांना हत्येच्या गुन्ह्यात अटक केली असून सध्या पुढील तपास बाभूळगाव पोलीस ठाणे करीत आहे.
आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल
आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या पतीच्या खून प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या सोबत सकारात्मक चर्चा होऊन देखील संतप्त झालेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आता याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या