Yavatmal Crime News: यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात सहा महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली गायब झाल्याचे पुढे आले आहे. त्यात त्यांची मानवी तस्करी (Yavatmal Crime News) केली जात असल्याचीधक्कादायकप्रकारसमोरआला आहे. यात एक मुलगी आणि तिचा प्रियकर यांच्यातीलसंभाषणाचीकथितऑडिओ क्लिप (Audio Clip) समोरआली आहे. त्यात कशा पध्दतीने मानवी तस्करी (Crime News)केली जाते, हे सांगितलं जातं आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी हा राळेगावमधील मजहर कुरेशी असल्याचादावाकरण्यातआलाआहे.
दरम्यान, यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला आहे. अल्पवयीन मुलींना परराज्यात विकले जात असल्याचा गंभीर आरोप करत देह व्यापार, मानवी तस्करी यांसारखे गंभीर प्रकार सुरू असल्याचा अतिशय धक्कादायक दावा प्रफुल चव्हाण यांनी केला आहे. अशातच, चव्हाण यांच्या आरोपांची आदिवासी विकास मंत्र्यांकडून दखल घेण्यातआलीअसून मंत्री डॉ. अशोक उईकेंनी (Ashok Uike) याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतलीय.
Ashok Uike : आदिवासी विकास मंत्र्यांकडून दखल, अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट
मंत्री डॉ. अशोक उईके यांनीपोलीस अधीक्षक अशोक थोरातांना याप्रकरणी तपासाच्या सूचना दिल्याआहेत. मात्र आदिवासी मंत्र्यांच्या तक्रारीनंतरही अजून याप्रकरणी गुन्हा दाखल नझाल्यानेआश्चर्यव्यक्तकेलंजातआहे. मंत्री अशोक उईकेंची उपविभागीय अधिकारी बन्सल यांच्याशीही याप्रकरणी चर्चा झालीअसूनया प्रकरणात जातीने लक्ष घाला, वेगानं तपास करा, अशा उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचनादेण्यातआल्याआहे. त्यामुळेयाप्रकरणातआतानेमकीकायकारवाईकेलीजाते, आणितपासाअंतीनेमकीकायमाहितीसमोरयेतंहेपाहणंमहत्वाचेठरणारआहे.
Yavatmal Crime भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्याकडून गंभीर आरोप, गृह विभागकडे दिलीमाहिती
दरम्यान, याप्रकरणातीलसंशयितआरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांनी त्याला सोडून दिले आहे. त्यांनतरतो तेलंगणामध्ये पळून जात असताना त्याला पुन्हा पकडले गेले. यात पोलिसांनी आरोपीला मदत करणाऱ्या पोलिसांना तपासापासून दूर ठेवावे, तसेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. यात आदिवासी मुलींना त्याच्या पालकांना पैश्याचे आमिष देऊन अश्या पध्दतीने फूस लावली जात आहे. ही गंभीर बाब आहे. आम्ही गृह विभागकडे याबाबत माहीती दिली आहे. राज्य सरकार सुद्धा गंभीर आहे. यात लवजिहाद, धर्मांतर असा अँगल असू शकतो, याचे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्याकडून करण्यात आली आहे.
Yavatmal Crime News: याप्रकरणातीलकथित ऑडिओ क्लिपमधील संवाद काय?
मुलगा - काय म्हणता.
मुलगी - पोरीचं काम घेऊन चालली मी पुण्याले.
मुलगा - अच्छा..अच्छा
मुलगी - एकटी नाही, तर काय दहा जण नेणार का?...शुभम मामा, आहे.. पोरी काढणारा.
मुलगा - शुभम मामा कोण... कुठला आहे?
मुलगी - आपल्याच गावातला आहे. फुकटनगरचा..
मुलगा - ते कल्याणी आत्याकाम करते काम..
मुलगी - हो
मुलगा - तिने काम सोडलं?
मुलगी - नाही
मुलगा - आपल्या गावात दिसते ती घराजवळ.. कल्याणी आत्या
मुलगी - मोबाईलवर काम करते
मुलगा - अच्छा... असं आहे का?
मुलगी - तिला जेल झाली होती या कामसाठी, तेव्हापासून मोबाईलवर काम करते. तीच निल झालं कि जाईल ती आता..
मुलगा - तीच नवरा?
मुलगी - बाप कल्याणी आत्याचा लग्न करून दिल होतं.. ते निघाली होती..
मुलगा - मजहर कुरेशी
मुलगी - हो, त्याचं दिल होत करून. खतरनाक काम आहे..
मुलगा - मदन कुरेशी हे काम करते
मुलगी - हो, ते कुरेशी करते काम, पैसा लय आहे पण बद्दूव्वा लागते..
मुलगा - तुला काय वाटे चागलं काम आहे का?
मुलगी- मला चागलं नाही वाटत, सांगत आहे.. पैसा भेटेत पण बद्दूव्वा लागते..
मुलगा - अच्छा मग तिघ चौघे आहे, पोरी काढण्यात आणिविकण्यात..
मुलगी - बापरे तिघ, तिघ चौघेनाही, लई जण आहे.. यात काम करते रॅकेट आहे.. पूनम अत्या आहे. किती जण आहे सांगू शकत नाही..
मुलगा - बापरे......
मेन कोण आहे...
मुलगी - यात मेन कोण नाही..यात काम लावणारे मेन आहे...
इतर महत्वाच्या बातम्या
