यमुनानगर : हरयाणा राज्यातील यमुनानगर येथील एक खळबळजनक घटना समोर आली असून एका महिला डॉक्टरसोबत (Doctor) अश्लील वर्तणूक केल्याप्रकरणी जिल्हा मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणजे सीएमओवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. महिला डॉक्टरच्या तक्रारीवरुन पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून संबंधित अधिकारी फरार असल्याची माहिती आहे. पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन महिला डॉक्टराने सीएमओकडून होत असलेल्या मानसिक व शारिरीक छळाची माहिती दिली. त्यामध्ये, 10 ते 15 मिनिटांत तयार हो, माझ्यासोबत शारिरीक संबंध (Sexual) ठेवायचे, असे म्हणत मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने कार्यालयातील डॉक्टर महिलेवर दबाव टाकल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
यमुनानगर येथील सरकारी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरने येथील सीएमओ मंजितसिंहवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. संबंधित अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून आपणास त्रास देत आहे. तसेच, जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असल्याचंही म्हटलं आहे. विशेष म्हणजे महिला डॉक्टर पुराव्याचा पेनड्राईव्ह घेऊनच पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात दाखल झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या महिलेने सर्व पुरावे पोलीस ठाण्यात दिले आहेत.
पीडित महिला डॉक्टर दलित असून मंजितसिंह याने जातीवाचक अपशब्द वापरत महिलेचा अवमान केला. तसेच, फोनवरुन अश्लील चॅटही महिला डॉक्टरला केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, याप्रकणी, एएसपी भूपेंद्रसिंह यांनी प्रकरणाची गंभील दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शारिरीक सुखाची मागणी ( Doctor Demand sexual relation)
पीडित महिलेनं एफआयआरमध्ये म्हटलं की, मंजित सिंह हा सातत्याने विक्षिप्त आणि लज्जास्पद वर्तन करत होता, त्यामुळे सीएमओ कार्यालयात जातानाही मला भीती वाटत होती. विनाकारण ते मला ऑफिसमध्ये बोलवत होते, आणि लज्जास्पद व जातीवाचक संवाद करत. 20 सप्टेंबर रोजी त्यांनी मला सातत्याने फोन केले. याबाबत आपण आईला माहिती दिली, तसेच फोनवरील संभाषण रेकॉर्डही केले आहे. दरम्यान, It’s now or never, get ready in 10 to 15 minutes असे म्हणत महिलेला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी फोनवरुन बोलवल्याचं कॉल रेकॉर्डींग पुरावा म्हणून पोलिसांना देण्यात आलं आहे. तसेच, तू का घाबरत आहेत, यापुढे कुठल्याही कामासाठी माझ्याकडे येऊ नको, मी तुझी मदत करणार नाही. अन्यथा, मला तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे आहेत, याबाबत कुणालाही बोलू नको, अशी धमकीही सीएमओने दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी मंजितसिंह विरुद्ध यमुनानगर पोलीस ठाण्यात BNS 75(2), 78 BNS, 3(1) (1) SC/ST ACT (1989) नुसार गुन्हा दाखल केला आहे.