Thane Crime News ठाणे: ठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे कुटुंब न्यायालयाच्या आवारात एका महिलेवर सामूहिक अत्याचार (Thane Crime News) झाल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिलेवर दोघांनी कारमध्ये सामूहिक अत्याचार केला. ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये सामूहिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

नेमकं काय घडलं? (Thane Crime News)

ठाणे कुटुंब न्यायालयाच्या आवारात एका महिलेवर दोघांकडून सामूहिक अत्याचार करण्यात आला. केकमध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंब न्यायालयाच्या आवारात चार चाकी वाहनात हिरालाल  केदार  आणि रवी पवार यांनी सामूहिक अत्याचार केला. हिरालाल केदार या आरोपीला अटक करण्यात आली असून रवी पवार हा फरार आहे. ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडली पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे 5 डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली.

मालेगावमध्येही धक्कादायक घटना (Malegaon Crime News)

मालेगावात 13 वर्षीय मतिमंद मुलीवर एका 55 वर्षाच्या संशयित आरोपीकडून अत्याचार करण्यात आल्याची निंदनीय घटना घडल्याने मालेगाव पुन्हा एकदा हादरले आहे. मालेगाव येथील पीडित मुलीला दिपक धनराज छाजेड या संशयित आरोपीने फूस लावून त्याच्या स्कुटीवर बसवून एका पडीत जागेवर नेत तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अत्याचार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्याची आज न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली असून त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Continues below advertisement

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Beed Crime News: ग्रामपंचायतीच्या शिपाईला लाकडी दांडे, रॉडने मारहाण; एक पाय फ्रॅक्चर..., बीडमधील धक्कादायक घटना