Virar Kalamb Beach Drowning : विरार परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. खाडी रानगाव येथील कळंब बीचवर (Kalamb Beach) पर्यटनासाठी आलेला 24 वर्षीय तरुण समुद्राच्या वेगवान लाटांमध्ये बेपत्ता झाला आहे. सत्य विश्वकर्मा असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून, तो मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) कंपनीत कार्यरत होता.
Virar Kalamb Beach Reverse Current : नक्की काय घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, सत्य विश्वकर्मा हा शुक्रवारी दुपारी त्याचा भाऊ शिवा विश्वकर्मा याच्यासोबत नालासोपारा (Nalasopara) येथून जवळच असलेल्या कळंब बीचवर फिरण्यासाठी आला होता. दुपारी 1 वाजेच्या सुमारास सत्य समुद्राच्या पाण्यात उतरला होता. त्याच वेळी खाडीच्या चॅनेलमध्ये 'रिव्हर्स करंट' (Reverse Current) म्हणजेच पाण्याचा अत्यंत वेगवान उलटा प्रवाह निर्माण झाला. या पाण्याचा अंदाज न आल्याने सत्य विश्वकर्मा पाण्याच्या प्रवाहासोबत समुद्रात वाहून गेल्याची तीव्र शक्यता वर्तवली जात आहे.
Virar Arnala Marine Police Search Operation : अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू
सत्य विश्वकर्मा पाण्यात वाहून गेल्याचे लक्षात येताच त्याच्या भावाने तातडीने मदतीसाठी टाहो फोडला. घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस (Arnala Marine Police Station) आणि वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता सत्य विश्वकर्माचा शोध घेण्यासाठी समुद्रात आणि किनारपट्टीच्या भागात तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
भरतीच्या वेळी आणि खाडीच्या प्रवाहात समुद्रात उतरणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे नागरिकांनी आणि पर्यटकांनी बीचवर योग्य ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांकडून सत्यचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
ही बातमी वाचा:
