विरार : एका अल्पवयीन मुलीला तिच्या अंगातील भूत उतरवतो असं सांगत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी बलात्कार करणारा मुख्य आरोपी हा अंध आहे. तर दुसऱ्या आरोपीने त्याला लॉजवर नेण्यासाठी मदत केल्याचं समोर आलं. या दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विरारमधील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अंगातील भूत काढण्याच्या नावाखाली एका 21 वर्षीय अंध आरोपीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. प्रेम पाटील असं आरोपीच नाव आहे. तो जन्मतः च आंधळा आहे.

नेमकं काय प्रकरण?

फिर्यादी ही करावीचं शिक्षण घेते. फिर्यादीच्या अंगात येत असल्याने फिर्यादीच्या मित्राने तिला आरोपी प्रेम पाटीलचं नाव सांगितलं. प्रेम पाटीलने पहिल तिला अंगारा दिला. मात्र त्याचा काहीही गुण आला नाही.

आरोपी प्रेम पाटीलने त्या मुलीला तुझ्या अंगात चार भूत आहेत, तुझ्या भविष्यासाठी हे चांगले नाही. तुला बाळ होणार नाही. तुझा नवरा पण जिवंत राहणार नाही असं सांगत भीती घातली. त्यानंतर तिच्या अंगातील भूत काढण्यासाठी एका लॅाजवर नेलं. त्या ठिकाणी मुलीच्या अंगावर लिंबू फिरवून, तिच्या अंगातील भूत काढण्यासाठी आरोपीने शारीरिक संबंध ठेवले.

अंगातील भूत काढण्यासाठी असेच 11 वेळा शारीरिक संबंध ठेवावे लागतील, त्यानंतरच भूत जाईल असं सांगितलं. याबाबत कुणालाही सांगू नकोस असंही सांगितलं. मात्र आरोपी आपली फसवणूक करत असल्याचं त्या मुलीला कळल्यानंतर तिने विरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली.

विरार पोलिसांनी आरोपी प्रेम पाटील आणि मुलीला लॅाजवर नेण्यासाठी मदत करणाऱ्या करण पाटील या दोघांच्या विरोधात बलात्कार, पोक्सो आणि महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना 11 ॲागस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही बातमी वाचा: