Vidyanand Bapat attack in Pune: पुण्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात ठामपणे भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांच्यावर गुरुवारी पुण्यात हल्ला झाला. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना त्यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केला. मात्र, त्याठिकाणी पोलीस आणि इतरजण उपस्थित असल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या हल्ल्यानंतर विद्यानंद बापट जराही डगमगले नाहीत. त्यांनी या हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांना तितक्याच शांतपणे प्रतिक्रिया दिली. माझी भूमिका योग्य आहे, हे मला माहिती आहे. मग मी त्यावर ठाम राहणार, असे विद्यानंद बापट यांनी सांगितले.  (Pune Crime news)

Continues below advertisement

गेल्या काही दिवसांमध्ये विद्यानंद बापट हे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. ते विविध प्रसारमाध्यमांना आणि वेब पोर्टल्सना मुलाखती देऊन आपली भूमिका हिरिरीने मांडत आहेत. या सगळ्या संभाषणांमध्ये विद्यानंद बापट यांनी उल्लेख केलेले 'घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्' हे संस्कृत सुभाषित प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. आज हल्ला झाल्यानंतर त्यांनी हल्लेखोराचा उद्देश स्पष्ट करताना पुन्हा याच सुभाषिताचा उल्लेख केला. विद्यानंद बापट यांनी म्हटले की, तुम्ही मला प्रश्न विचारत होतात, तेव्हा एक वेडा आला आणि त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो, पोलीस नव्हते बघून हल्ला केला. पोलिसांकडे रिव्हॉल्व्हर नाही. सवंग प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यावर हल्ला केला. या सगळ्याचे व्हिडीओ फुटेज आहे, ते पोलिसांनी बघून कारवाई करावी. त्याला पोलीस चौकीत घेऊन तुडवून काढा. म्हणजे मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, हे त्याला कळेल. त्याला सरळ सांगून कळणार नाही. त्याच्याशी काय युक्तिवाद करणार का, झोंबीसोबत युक्तिवाद होतो का?, असा सवाल विद्यानंद बापट यांनी विचारला. उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि रहदारीस अडथळा होणार नाही,याची खबरदारी घ्यावी, हे माझे म्हणणे आहे. बाकी तुम्ही उत्सव साजरे करु शकता. त्याबाबत मी आक्षेपच घेतलेला नाही. सवंग प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला, असे विद्यानंद बापट यांनी म्हटले. 

या हल्ल्याच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु आहे. विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती कोण होती, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, पोलीस आता या व्यक्तीवर कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  आणखी वाचा

Continues below advertisement

Vidyanand Bapat Pune Ganesh Utsav DJ: विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?