Vidyanand Bapat and Santosh Chavan: पुण्यात गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला (Noise Pollution) विरोध करत डीजेवर (DJ) बंदी घालण्याची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांच्यावर काल टिळक रस्त्यावर प्राणघातक हल्ला झाला. या घटनेनंतर अवघ्या तीन तासांत पुणे क्राईम ब्रँचने (Pune Crime Branch) आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, हल्ला करणारा संतोष चव्हाण (Santosh Chavan) हा कोणताही नवखा नसून पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार निघाला आहे.

Continues below advertisement

Santosh Chavan: शिक्षण बी.कॉम, पण वृत्ती गुन्हेगारीची

राऊतवाडी (Rautwadi) परिसरातील रहिवासी असलेला संतोष चव्हाण हा सुशिक्षित असून त्याने वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण केली आहे. तो पोटापाण्यासाठी टिंबर मार्केटमधील एका छोट्या इलेक्ट्रॉनिक दुकानात नोकरी करत होता. मात्र, उच्चशिक्षित असूनही तो गुन्हेगारीच्या अंधाऱ्या विश्वात गुरफटलेला होता.

Santosh Chavan: जन्मदात्या बापाला बेदम मारहाण; वडिलांनी तोडले नाते

संतोषच्या गुन्हेगारी वृत्तीचा सर्वात भयानक चेहरा तीन वर्षांपूर्वी समोर आला होता. ज्या हातांनी जन्मदात्या वडिलांचा सांभाळ करायचा, त्याच हातांनी त्याने आपल्या वडिलांना बेदम मारहाण केली होती. या धक्कादायक कृत्यामुळे खचलेल्या वडिलांनी संतोषशी असलेले सर्व रक्ताचे नाते कायमचे तोडून टाकले होते.

Continues below advertisement

Santosh Chavan: 5 ते 6 गंभीर गुन्हे दाखल; फोन बंद करून पळण्याचा प्रयत्न

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संतोष चव्हाण याच्यावर पुण्यात कट रचणे, प्राणघातक हल्ला करणे आणि मारामारी यांसारखे 5 ते 6 गंभीर गुन्हे आधीपासूनच नोंद आहेत. बापटांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून त्याने तातडीने स्वतःचा मोबाईल फोन बंद केला आणि फरार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुणे क्राईम ब्रँचच्या पथकाने अवघ्या 3 तासांत त्याचा माग काढून त्याला बेड्या ठोकल्या.

Vidyanand Bapat and Santosh Chavan: कडक कारवाईची मागणी

विद्यानंद बापट यांच्यावरील मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला असून, सर्वसामान्यांमधून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. हा घटनाक्रम थेट व्यक्ती स्वातंत्र्यावर आणलेला घाला असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पुणे पोलिसांनी आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता पुणेकरांकडून केली जात आहे.

आणखी वाचा 

Vidyanand Bapat attack in Pune: मुलाखत सुरु असताना हल्ला झाला, पण विद्यानंद बापट स्थितप्रज्ञपणे उभे राहिले, दुसऱ्या क्षणी तेच जगप्रसिद्ध वाक्य उच्चारलं