Vasai Crime News: वसई शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलगा आणि त्याच्या मित्राकडून होत असलेल्या कथित मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून 84 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या (Vasai Crime News) केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. वसईच्या नायगाव परिसरात हि खळबळजनक घटना घडली आहे. गॅब्रिअल डॉमिनिक कुटीनो असे मृताचे नाव आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी मुलगी रूपा नोयल चिरायत हिची भेट घेऊन तिला एक बॅग दिली. त्यात सुसाइड नोटसह (Crime News) महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Vasai Crime News: आत्महत्येपूर्वी मुलीला दिली बॅग, अन् धावत्या लोकलसमोर झोकून देत जीवन संपवलं
मुलीच्या तक्रारीनुसार, तिचा भाऊ शाम कुटिनो मागील 12 ते 13 वर्षांपासून वडिलांना किरकोळ कारणांवरून त्रास देत होता. 26 सप्टेंबर रोजी अंड्याचे शेल्फ फुटल्याच्या कारणावरून त्याने वडिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर श्यामचा मित्र सागर यानेही त्यांना मारहाण केली. एवढेच नव्हे तर जेवणाची थाळी हिसकावून घेऊन त्यांना उपाशीपोटी घराबाहेर काढल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
तर 28 सप्टेंबर रोजी मुलीला तिच्या शाळेत भेटले आणि एक बॅग देत त्यात महत्त्वपूर्ण कागदपत्रे पैसे असल्याचे सांगितले आणि नंतर कुटिनो नायगाव रेल्वे स्थानकावर गेले आणि तेथे धावत्या लोकलसमोर झोकून देत जीवन संपवले. नंतर मुलीला त्या बॅगमध्ये एक चिठ्ठी दिसली त्या चिठ्ठीमध्ये मुलगा शाम आणि सागर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद असल्याचा दावा मुलीने केला आहे. या छळाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचेही समोर आले आहे.
Crime News : शाम आणि सागरविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
दरम्यान, या प्रकरणी भाईंदर रेल्वे पोलिसांनी शाम आणि सागरविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्रयाघटनेनंपरिसरातमोठीखळबळउडालीअसूनयाप्रकरणीआतापोलीसतपासातूनआणखीकायनवीमाहितीसमोरयेते, हेपाहणेमहत्वाचेठरणारआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
