पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणला सहआरोप करणे चुकीचं आहे, उलट त्याने बाळाची काळजीच घेतली असा युक्तिवाद राजेंद्र हगवणेच्या वकिलांनी केला. निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईकही नाही, त्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोपही हगवणेंच्या वकिलांनी केला. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सुनावणी पुणे कोर्टात पार पडली. त्यामध्ये वैष्णवीचा पती, आई आणि नणंदेची कोठडी एक दिवसाने वाढवण्यात आली. तर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला 31 मे पर्यंत कोठडी  सुनावण्यात आली. 

निलेश हा वैष्णवीची नणंद करिश्माचा मित्र आहे. केवळ एवढंच नाही तर स्वतःच्या पत्नीचा छळ केल्याप्रकरणी 2022 मध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वतःच्या पत्नीचे स्पाय कॅमेऱ्याने आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केल्याबद्दल पत्नीने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. निलेश चव्हाणवर वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि बंदुकीचा धाक दाखवत वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे.

Vaishnavi Hagawane Suicide Case : निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळ केला

राजेंद्र हवगणेंच्या वकिलांनी युक्तिवाद करताना निलेश चव्हाणला सहआरोपी करणे चुकीचं असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, "निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळ केला. पण हेळसांड केली म्हणून त्याच्यावरच गुन्हा दाखल केला. निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही. तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या. पण त्याला या प्रकरणात आरोपी करणेच चुकीचे आहे‌."

Nilesh Chavan : निलेश चव्हाण फरार

निलेश चव्हाणवर 22 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण तेव्हापासून तो फरार आहे. याच निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची चार पथकं आणि पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही शोध घेत आहेत. त्याचं लोकेशन मिळावं यासाठी टेक्निकल एक्स्पर्ट्सचीही मदत घेतली जात आहे. 

निलेश चव्हाणने स्वतःच्या पत्नीचाही छळ केला

हगवणे कुटुंबात जसा सुनांचा छळ सुरु होता, तसाच प्रकार निलेश चव्हाणच्या घरातही चालला होता. निलेश चव्हाण आपल्या बायकोचा अमानुष छळ करायचा. तो विकृत असल्याचंही समोर आलं आहे. बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावून स्वत:च्याच बायकोचे आक्षेपार्ह व्हिडीओही त्यानं बनवले होते. 

निलेश चव्हाणच्या पत्नीच्या तक्रारीनुसार त्याच्या लॅपटॉपमध्ये तिच्या आक्षेपार्ह व्हिडीओंसोबतच अन्य महिलांचे देखील आक्षेपार्ह व्हिडीओ आढळून आले होते. ते व्हिडीओ कोणत्या महिलांचे होते आणि त्यांचा निलेश चव्हाणशी काय संबंध होता हे अजून समोर आलेले नाही. 

Nilesh Chavan Lookout Notice : निलेश चव्हाण विरोधात लूकआऊट नोटीस

फरार निलेश चव्हाणच्या विरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. 22 मे रोजी निलेश चव्हाणच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. निलेश सहा दिवस उलटून गेले तरी अजून तो फरार आहे 

ही बातमी वाचा: