Ulhasnagar Crime News : राज्यभरातगाजतअसेलेलानाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणअसो, किंवासोलापूर जिल्ह्यातील भोंदू बाबा मनोहर भोसले (Manohar Bhosle) प्रकरणअसो, हेसर्वप्रकरणंताजेअसतानाराज्यातइतरअनेकभोंदूबाबांचेधक्कादायकप्रकारसमोरयेतआहे. अशातचठाणेजिल्ह्यातूनएकधक्कादायक (Ulhasnagar Crime) बातमीसमोरआलीआहे. यात उल्हासनगरमध्ये पूजापाठ करण्याच्या बहाण्याने घरी येऊन 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडलीआहे. या प्रकरणी उल्हासनगरमध्ये राहत सलेल्या भोंदूबाबा साहिद शेखविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भोंदू बाबा शाहिद शेखला पोलिसांनी अटक केलीअसूनपोलीसपुढीलतपासकरत आहे. (Ulhasnagar Crime news)

Continues below advertisement

Ulhasnagar Crime News : तोकड्या कपड्यात बसण्यास भाग पाडलं, नकोतिथंस्पर्शकरतविनयभंग

मिळालेल्यामाहितीनुसार, साहिद शेख याने कल्याणमधील पीडित मुलीच्या आईशी ओळख काढत घरात शांतता नांदावी यासाठी पूजापाठ करून देण्याचे सांगत 2 मेला तिच्या घरी आला. यावेळी थातूरमातूर पूजा केल्यानंतर 15 वर्षीय मुलीला तोकड्या कपड्यात समोर बसण्यास भाग पाडले. यानंतर तिला स्पर्श करत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या पीडितेने याबाबत वाच्छाता न केल्याने, पूजेच्या नावाखाली साहिद याने पुन्हा 6 मे रोजी या मुलीचे घरी आला व लगट करण्याचा प्रयत्न केला.

Continues below advertisement

Ulhasnagar Crime : भोंदूबाबा निघून गेल्यावर घाबरलेल्या मुलीने आईला सर्व सांगितलं

दरम्यान, घाबरलेल्या मुलीने भोंदूबाबा निघून गेल्यावर आईला हा प्रकार सांगितला. आईने मुलीसह खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत साहिद शेख विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास खडकपाडा पोलीस करत आहेत. मात्रयाघटनेननंतरपरिसरातखळबळउडालीअसूनपोलीसपुढीलकारवाईकरतआहे.

Ulhasnagar : किरकोळ वादातून फ्रीस्टाईल हाणामारी, “तुला रोडवरून चालता येत नाही का?” म्हणत बेदम मारहाण

उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा किरकोळ कारणावरून फ्रीस्टाईल हाणामारीची घटना घडली आली आहे.मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 5 मधील भगवानदास हॉस्पिटलजवळ रस्त्यावरून चालत जाणाऱ्या एका तरुणाला काही अज्ञात युवकांनी अडवत “तुला रोडवरून चालता येत नाही का?” असा सवाल करत वाद घालण्यास सुरुवात केली. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच हाणामारीत बदलला. आरोपींनी संबंधित तरुणाला रस्त्यातच बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजमध्ये आरोपी तरुणाला मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत.घटनेनंतर जखमी तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे.