Bhopal Crime Case: भोपाळमध्ये 33 वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर देशभरात एकच खळबळ उडाली. त्विशा शर्मा या तरुणीने 2025 मध्ये भोपाळच्या समर्थ सिंह सोबत लग्न केलं होतं. 12 मेच्या रात्री दोन महिन्यांची गर्भवती असलेल्यात त्विशाचा मृतदेह तिच्या सासरच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यात मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी आणि भावाने सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.  33 वर्षीय त्विशाने लग्न करून फसल्याचा मेसेज तिच्या मैत्रिणीला केला होता. हे शेवटचे मेसेज सध्या समोर आले आहेत. 'मी लग्नाच्या जाळ्यात अडकले आहे. तू अडकू नकोस. आत्ता मला बोलता येत नाहीये. योग्य वेळ आली की मी तुला फोन करेन.' असा मेसेज तिने तिची मैत्रीण मीनाक्षीला केला होता. यावर तिच्या मैत्रिणीने 'तुझी खूप काळजी वाटते टुकटुक 'माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ' असा मेसेज तिला केला होता. त्विशा तिच्या मैत्रिणीला कॉल करणार होती पण ती वेळ कधीच आली नाही. दुसऱ्या दिवशी त्विशाचा मृतदेह तिच्या नवऱ्याच्या घरात आढळून आला.

Continues below advertisement

कोण आहे त्विशा शर्मा ?

Miss Pune हा किताब पटकावलेल्या नोएडाच्या त्विशा शर्मा या 33 वर्षीय विवाहितेचा मृतदेह भोपाळ मधील तिच्या सासरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यावेळी ती दोन महिन्यांची गरोदर होती. 12 मे 2026 ला त्विशाने तिचा आयुष्य संपवलं. तिचा नवरा समर्थ सिंग हा पेशाने वकील आहे. त्यांची ओळख 2024 मध्ये डेटिंग ॲप द्वारे झाली होती. 2025 मध्ये दोघांनी लग्न केलं. मुळची नोएडाची असलेली त्विशा लग्नानंतर भोपाळला गेली.  लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच त्विशाचा मृतदेह तिच्या घरी आढळला .

मृत्यूपूर्वी तिने instagram वर तिच्या मैत्रिणीला काही मेसेज केले होते. ते सध्या समोर आले आहेत. शिवाय त्विशाच्या आई-वडिलांनी आणि भावानेही तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्विशाला झालेला त्रास तिने तिच्या मैत्रिणीला सांगण्याचा प्रयत्नही केला होता. तिच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा तिने त्विशाशी संपर्क केला त्यावेळी ' लग्नाच्या जाळ्यात मी अडकून पडले आहे ' तू यात अडकू नकोस. मला माहेरची आठवण येत आहे. मी नेमकं काय करावं हेच मला समजत नाहीये. माझ्या परीने मी प्रयत्न करते पण मला कोणीही समजून घेत नाही.. असं तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं होतं. हेच शब्द तिच्या अखेरचे शब्द ठरले. 

Continues below advertisement

हुंड्यासाठी त्विशाचा छळ, वडिलांचा आरोप

त्विशाचे वडील नवनिधी शर्मा यांनी सांगितले की लग्नानंतर काही काळ सगळं ठीक होतं. पण नंतर सासरच्या लोकांनी तिचा हुंडासाठी छळ करायला सुरुवात केली. बारावीच्या रात्री दहा वाजता तिने आईला फोन केला होता. आणि सांगितलं होतं की माझा खूप छळ केला जातोय मी आता आणखी सहन करू शकत नाही. त्विशाच्या शुभविच्छेदन अहवालात तिचा गळफास घेतल्यानेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.तिच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणाही आढळल्या आहेत.