Twisha Sharma Death Case: आठवड्यापूर्वी गर्भपात; घरात लटकलेल्या अवस्थेत आढळली निवृत्त न्यायाधीशांची सून, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
Twisha Sharma Death Case: त्विषाच्या हातालाही झाली आहे. दुखापत अहवालानुसार १ आठवड्यापूर्वी केलेला गर्भपात केल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली : नोएडा येथे राहणाऱ्या त्विषा शर्मा (वय ३३) हिचा लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यांत संशयास्पद परिस्थितीत (Twisha Sharma Death Case) मृत्यू झाला. भोपाळस्थित वकील समर्थ सिंह यांच्याशी त्यांचा डिसेंबर २०२५ मध्ये विवाह झाला होता. समर्थचे वडील निवृत्त न्यायाधीश असून आई गिरीबाला सिंह याही माजी न्यायिक अधिकारी आहेत. त्विषाचा सासरी छळ (Twisha Sharma Death Case) झाला, असा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा सासरच्यांविरुद्ध दाखल केला होता. १२ मे रोजी संध्याकाळी ८ च्या सुमारास त्विषा शर्मा मृत्यू (Twisha Sharma Death Case) झाला होता. आता त्विषा शर्माचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. गळफासामुळे त्विषाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आला आहे. त्विषाच्या हातालाही झाली आहे. दुखापत अहवालानुसार १ आठवड्यापूर्वी केलेला गर्भपात केल्याची माहिती समोर आली आहे. (Twisha Sharma Death Case)
ट्विशा शर्माच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता की, त्यांच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, आता पोस्टमार्टम (शवविच्छेदन) रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. भोपाळमधील मॉडेल त्विषा शर्माच्या मृत्यूच्या प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड झाल्या आहेत. 'एम्स' (AIIMS) भोपाळच्या रिपोर्टमध्ये त्विषाचा मृत्यू फाशी लागल्यामुळे झाल्याची पुष्टी झाली आहे. रिपोर्टनुसार, १२ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तसेच तिच्या हातावर जखमेच्या खुणाही आढळून आल्या आहेत. याशिवाय, मृत्यूच्या साधारण एक आठवड्यापूर्वी त्विषाचा गर्भपात (अबॉर्शन) झाला होता, अशी माहितीही रिपोर्टमध्ये समोर आली आहे.(Twisha Sharma Death Case)
Twisha Sharma Death Case: पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय समोर आले?
एम्स भोपाळच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, त्विषाचा मृत्यू (Ante mortem hanging) म्हणजेच जिवंत असताना फास लागल्यामुळे झाला. डॉक्टरांना तिच्या गळ्यावर वरच्या बाजूला जाणारा 'लिगेचर मार्क' (फासाची खूण) आढळला, जो सामान्यतः फाशीच्या प्रकरणांमध्ये दिसून येतो. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, गळ्याच्या आतील स्नायूंवर दबाव आणि रक्तस्त्रावाच्या खुणा सापडल्या आहेत. मात्र, हायॉइड बोन (गळ्याचे हाड) आणि गळ्याची इतर हाडे सुरक्षित आढळली. डॉक्टरांच्या मते, शरीरावर कोणत्याही मोठ्या संघर्षाचे किंवा जीवघेण्या हल्ल्याचे निशाण मिळालेले नाहीत. तरीही, हातासह शरीराच्या काही भागांवर किरकोळ जखमा आणि ओरखडे नक्कीच आढळले आहेत. या जखमा कशामुळे झाल्या, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहेत.
Twisha Sharma Death Case: फुफ्फुसांवर सूज आणि डोळ्यांत रक्तस्त्राव
रिपोर्टमध्ये हे देखील समोर आले आहे की त्विषाच्या दोन्ही फुफ्फुसांवर सूज आणि कंजेशन (रक्ताचा साठा) होते. डोळ्यांमध्ये छोट्या रक्तस्त्रावाच्या (पेटीचियल हेमरेज) खुणाही आढळल्या. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशी लक्षणे अनेकदा फाशीच्या प्रकरणांमध्ये दिसून येतात. शरीरावर कोणत्याही प्रकारच्या गंभीर लैंगिक हल्ल्याचे किंवा शस्त्रास्त्रांच्या जखमांचे संकेत मिळालेले नाहीत, हेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
Twisha Sharma Death Case: FSL आणि DNA चाचणीची प्रतीक्षा
या प्रकरणातील सत्य पूर्णपणे समोर आणण्यासाठी डॉक्टरांनी व्हिसरा, रक्त आणि इतर सॅम्पल्स सुरक्षित ठेवले आहेत. ते एफएसएल (FSL) चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मृत्यूपूर्वी त्विषाने कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ किंवा विषारी पदार्थ घेतले होते की नाही, हे या चाचणीतून स्पष्ट होईल. याव्यतिरिक्त, डीएनए (DNA) चाचणीसाठी देखील सॅम्पल्स सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. एफएसएल रिपोर्ट आल्यानंतर तपासात अनेक गोष्टी अधिक स्पष्ट होतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
Twisha Sharma Death Case: जिम्नॅस्टिक रिंगच्या दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळली होती
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अशीही नोंद आहे की, त्विषा शर्मा घरातील छताला असलेल्या जिम्नॅस्टिक रिंगच्या दोरीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळली होती. नातेवाईकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सध्या पोलीस पोस्टमार्टम रिपोर्ट आणि इतर पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Twisha Sharma Death Case: सासरच्या घरी आढळला होता मृतदेह
३३ वर्षांची त्विषा शर्मा १२ मे रोजी रात्री भोपाळच्या कटारा हिल्स परिसरातील तिच्या सासरच्या घरी मृत अवस्थेत आढळली होती. या घटनेनंतर कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्विषाचा पती समर्थ सिंह आणि सासू गिरिबाला सिंह यांच्याविरुद्ध हुंडाबळी आणि छळाचा गुन्हा दाखल केला होता. गिरिबाला सिंह या निवृत्त न्यायाधीश (रिटायर्ड जज) असल्याची माहिती आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत. घटनेनंतरपासूनच हे प्रकरण प्रचंड चर्चेत आहे.
Before You Go
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या






















