धाराशिव : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात (Tuljarpur Drugs Case) आता मोठी माहिती समोर येत आहे. आरोपी महिला संगीता गोळेच्या (Sangita Gole) बँक खात्यावरून तब्बल पाच कोटींचे व्यवहार झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून (Police) आरोपी महिला संगीता गोळेचे बँक खाते सील करण्यात आले आहे. तर पाव किलो सोने देखील जप्त करण्यात आले आहे. या बँक खात्यातून ड्रग्जसाठी आर्थिक व्यवहार झाले का? कोणाच्या माध्यमातून हे व्यवहार झाले, याबाबत आता पोलीस तपास करणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे, युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या तीन आरोपींना प्रथम ड्रग्जसह तामलवाडी येथे रंगेहाथ अटक करण्यात आले होते. यानंतर या तीन आरोपींची चौकशी केल्यानंतर ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई येथील महिला तस्कर संगीता गोळे, स्वराज उर्फ पिनू तेलंग व वैभव गोळे, मुंबई येथील संतोष खोत, तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, स्वराज उर्फ पिनू तेलंग व वैभव गोळे यांना आरोपी करण्यात आले. यानंतर फरार झालेल्या तीन स्थानिक आरोपींना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची साखळी दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आरोपी महिलेकडे सापडलं मोठं घबाड
आता तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आता मोठी माहिती समोर येत आहे. आरोपी महिला संगीता गोळेच्या बँक खात्यावरून तब्बल पाच कोटींचे व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांकडून आरोपी महिला संगीता गोळेचे बँक खाते सील करण्यात आले आहे. तर पाव किलो सोने देखील जप्त करण्यात आले आहे. आरोपी महिलेच्या मुंबईसह लोणावळ्यात मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 16 आरोपी करण्यात आले आहेत. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. तर ड्रग्ज प्रकरणातील अटकेत असणारा आरोपी पिंटू मुळेचे राजकीय नेत्यासोबत लागेबांदे असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, संगीता गोळेच्या बँक खात्यातून ड्रग्जसाठी आर्थिक व्यवहार झाले का? कोणाच्या माध्यमातून हे व्यवहार झाले? याबाबत पोलीस तपास करणार आहे. आता पोलिसांच्या तपासात काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा