Tuljapur Drugs Case: तुळजापूर ड्रग्स प्रकरणात 35 आरोपींपैकी 21 अद्याप फरार; खास हॉटेलमधून ड्रग्जची विक्री, भीतीपोटी अनेकांनी गाव सोडलं
Tuljarpur Drugs Case: धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात (Tuljarpur Drugs Case) रोज नवी धक्कादायक माहिती समोर येत असताना या प्रकरणी आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.

धाराशिव : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात (Tuljarpur Drugs Case) रोज नवी धक्कादायक माहिती समोर येत असताना या प्रकरणी आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ड्रग्ज प्रकरणात नाव येण्याच्या भीतीने तुळजापुरातून जवळपास 100 लोक गायब झाल्याची माहिती पुढे आली आहे. सोबतच तुळजापुरात जवळजवळ 15 ते 20 पेडलरच्या माध्यमातून ही ड्रग्ज तस्करी होत असल्याची ही माहिती आहे. तुळजापुरातील काही खास हॉटेलमधून या ड्रग्जची (Drugs Case) विक्री व्हायची, असे ही सांगितलं जातंय. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे अधिक खोलवर गेल्याचे दिसत असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
35 आरोपींपैकी 21 आरोपी अद्याप फरार
दुसरीकडे, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी विरोधात गुन्हा दाखल. मात्र त्यातील अनेक आरोपी अद्याप फरार आहे. त्यामुळे या फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे हे ही पोलिसांपुढाचं आव्हान असणार आहे. दरम्यान आता या ड्रग्ज तस्करी प्रकरण तुळजाभवानी मंदिरापर्यंत पोहचल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून यात पुजाऱ्यांचा ही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. अशातच ड्रग्ज प्रकरणातील 35 आरोपींपैकी 14 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असून अजूनही 21 आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पुढे आली आहे.
लातूर जिल्हयात ड्रग्ज बनविण्याच्या कारखान्यावर धाड
मुंबई येथील महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पुणे येथील त्यांच्या प्रादेशिक युनिटसच्या मदतीने लातूर जिल्हयात ड्रग्ज बनविण्याच्या कारखान्यावर धाड टाकून, मुद्देमाल जप्त करत कारवाई केली आहे. त्यात पोलिसांनी कारखान्यात काम करणा-या तिघांना आणि मिरा रोड आणि मुंबई परिसरात ड्रग्ज पुरवठा करुन विक्री करणा-या मुद्दू नावाच्या व्यक्तीला हटकेश येथून मंगळवारी ताब्यात घेतले आहे.
तर मिरा भाईंदर,वसई विरार पोलीस आयुक्तालय अतर्गत येणा-या नयानगर पोलीस ठाण्यात ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेत काम करणारे पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे याच्या शेतात ड्रग्ज बनवण्याचा कारखाना असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रे हे आपल्या मूळ गावी रोहिना येथून मागच्या १५ दिवसांपासून वैद्यकिय रजेवर होते. त्याला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यात आणखीन एक पोलीस हवालदार पवार याच नाव येत आहे. तसेच यात काही वरिष्ठ पोलीस अधिका-यांचा सहभाग असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा





















