Tukaram Mundhe FDA Action पुणे : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात गेल्या काही महिन्यात एफडीएने (FDA) कारवाईचा धडाका लावला असून अगदी पान टपऱ्यांपासून ते पंचतारांकीत हॉटेलपर्यंतच्या आस्थापनांवर कारवाई केली जात आहे. त्याच अनुषंगाने आता पुण्यातील पेठाही FDA च्या रडारावर (FDA Action in Pune) असल्याची माहिती समोर आली आहे. कारण पुण्यातील पेठांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई करत अनेक मिठाईच्या दुकानांवर छापा टाकला आहे. तर शहरातील 5 हॉटेलचे परवाने देखील निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच पुण्यासह सातारा आणि सांगलीमध्ये देखील FDA कडून कारवाई करण्यात आली आहे.
Pune FDA Action: 4 दिवसांत 45 लाख 70 हजार 168 रुपयांचा अन्नसाठा जप्त, 5 हॉटेलचे परवानेही निलंबित
मिळालेल्यामाहितीनुसार, अन्नातील भेसळ, निकृष्ट दर्जा आणि अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात मोठी कारवाई करून 4 दिवसांत 45 लाख 70 हजार 168 रुपयांचा संशयित निकृष्ट, असुरक्षित आणि चुकीच्या लेबलिंगचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. तर FDA ने 24 ते 27 जुलैदरम्यान राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत पुणे शहरातील गणेश पेठ व नाना पेठ परिसरातील घाऊक व्यापाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले. तपासणीदरम्यान मिठाई, कँडी, चॉकलेट, सुका मेवा, मसाले, फरसाण आदी अन्नपदार्थ संशयित निकृष्ट, असुरक्षित, चुकीच्या लेबलिंगचे किंवा परवान्याशिवाय साठविल्याचे आढळले. त्यानंतर संपूर्ण साठा जप्त करून नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासह पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात देखील कारवाई करत कुल्फी उत्पादन केंद्राच परवाना रद्द करण्यात आला आहे. तर तिकडे पुण्यासह सातारा आणि सांगली देखील FDA कडून कारवाई करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
