एक्स्प्लोर

Tukaram Mundhe FDA Nagpur: नागपुरात तुकाराम मुंढेंच्या FDA अन् अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; नशा आणणाऱ्या औषधांचा 22 लाखांचा बेकायदेशीर साठा जप्त

Tukaram Mundhe FDA action in Nagpur stock of intoxicating drugs worth rs 22 lakh seized joint action by Anti Narcotics Task Force and FDA marathi news

Tukaram Mundhe FDA Nagpur: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे (Maharashtra Food and Drug Administration) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी कारवायाचा धडाका लावला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सुरु असलेल्या कारवाईच्या सत्रामुळे तुकाराम मुंढे चांगलेच चर्चेत आले असून त्यांच्या या कारवाईमुळे नियमबाह्य आणि भेसळखोरी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. अशातच नागपुरात अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) आणि अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स विभागाने संयुक्तिकरित्या मोठी कारवाई केली आहे. नागपुरात नशा आणणाऱ्या औषधांचा 22 लाख रुपयांचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला आहे.

Nagpur: औषध दुकानात विनापरवाना औषध विक्री, छापा घालून 22 लाख 3 हजार रुपये किमतीचा औषध साठा जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या भारत माता चौक परिसरातील एका औषध दुकानात विनापरवाना औषध विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे छापा घालून 22 लाख 3 हजार रुपये किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आलाय. तर वाठोडा परिसरात एका फार्मसीमध्ये औषध नियमावलीनुसार आवश्यक कागदपत्रे नसताना औषध विक्री सुरू असल्याचे समोर आले. परिणामी या दुकानाचा औषध परवाना रद्द करण्याचे एफडीएकडू प्रस्तावित करण्यात आले आहे.

Yavatmal: अधीक्षकसह कर्मचाऱ्यांना नोटीसा; सफाई कामगाराचे इन्क्रिमेंट रद्द, बोटोणी आश्रमशाळेची जिल्हाधिकाऱ्यांकडून अकस्मात पाहणी

मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील शासकीय आश्रमशाळेला जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज अचानक भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी आश्रमशाळेतील विविध सोयी-सुविधांबाबत शाळा प्रशासनाची झाडाझडती घेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. कामकाजातील त्रुटी व निष्काळजीपणाबाबत आश्रमशाळेचे अधीक्षकसह कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आले असून सफाई कामगाराचे इन्क्रिमेंट रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले. 

Yavatmal News : 30 ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश

यावेळी आश्रमशाळेतील वर्गखोल्या, डिजिटल क्लासरूम, वसतिगृह, प्रसाधनगृह शाळेची इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध आहे का? तसेच शाळेतील स्वच्छता व व्यवस्थापनाची स्थिती याबाबत आढावा घेतला. शाळेतील या सर्व आवश्यक सुधारणा, स्वच्छता व व्यवस्थापनाशी संबंधित कामे पूर्ण करून त्याचा अहवाल 30 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Judge Shocking Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Advertisement

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget