एक्स्प्लोर

परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक, भिवंडीत उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ट्रकसह 1 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त 

भिवंडी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यास अटक करण्यात आलं आहे. ट्रकसह 1 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Bhiwandi Crime News : भिवंडी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यास अटक करण्यात आलं आहे. ट्रकसह 1 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुंबई नाशिक मार्गावरील वडपे गावच्या हद्दीत परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनर चालकाला ताब्यात घेवून अटक केली आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्याकडून 27 लाखांच्या ट्रकसह तब्बल 1 कोटी 90 लाख 35 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हनुमान मोबता राम (२८) ताब्यात घेवून अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.सदर अवैध दारूची वाहतूक ही गोव्याहून राजस्थान मधील उदयपूर राज्यात होणार असल्याचे सापळा कारवाईत उघड झाले आहे.या गुन्ह्याचा तपास गुन्हयाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क भिवंडी विभागाचे निरीक्षक सुभाष एस.खंडेराय हे करत आहेत.

गोदावरी नदीपत्रात अवैध रेती उत्खनन प्रकरण, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसह 19 जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल

बीडच्या गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपत्रात असणाऱ्या राक्षसभुवन रेती घाटातील कथित अवैध रेती उत्खनन, वाहतूक आणि घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसह 19 जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन तलाठी, एक महसूल सेवक आणि एका पोलिसासह इतर खाजगी व्यक्ती अशा 19 जणांवर गुन्हा नोंदवला गेला आहे. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी गोदावरी नदीपात्रातून घरकुलाच्या नावाखाली 100 कोटींच्या वाळूचे उत्खनन झाल्याचा आरोप केला होता. याची वरिष्ठ पातळीवर तक्रार देखील करण्यात आली होती. त्यानंतर गेवराईचे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी फिर्याद दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गठीत चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळल्याने हा गुन्हा नोंद करण्यात आला. ऑगस्ट 2025 पासून राक्षसभुवन घाटातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या नावाचा वापर करून शासकीय खनिज संपत्तीची चोरी, डिजिटल डेटामध्ये छेडछाड करून फसवणूक, गोदावरी नदीपात्राचे पर्यावरणीय नुकसान आणि विद्रुपीकरण, तसेच शासकीय यंत्रणेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गु.र.नं. 199/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS), आयटी अ‍ॅक्ट, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि लोकसंपत्ती नुकसान निवारण कायदा 1984 अंतर्गत विविध गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
Nashik News : भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
Nashik News : भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
Shubman Gill : शुभमन गिलकडे वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी, सध्या गिल दुसऱ्या स्थानी, टॉपवर कोण?
शुभमन गिल दुसऱ्या वनडेत आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणार? कॅप्टन गिलकडे मोठी संधी
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
Embed widget