एक्स्प्लोर

Titwala Crime: टिटवाळ्यात धक्कादायक घटना, पसायदान वसतीगृहात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, मुलांना बेदम मारहाण

Kalyan Crime News : कल्याणच्या टिटवाळा जवळील खडवलीच्या खाजगी वसतिगृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक (Titwala Crime) अत्याचार केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

Kalyan Crime News : कल्याणच्या टिटवाळा जवळील खडवलीच्या खाजगी वसतिगृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक (Titwala Crime) अत्याचार केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. सोबतच इतर मुलांना बेदम मारहाण केल्याचेही बोललं जात आहे. जिल्हा बाल कल्याण समितीच्या पाहणी दरम्यान हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

पुढे आलेल्या माहितीनुसार, खडवलीतील पसायदान या खाजगी वसतिगृहात हा गेल्या अनेक दिवसापासून प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठत कारवाई सुरू केली असून या प्रकरणी आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. यात आश्रम शाळा चालवणारा संचालक बबन शिंदे, त्याचा मुलगा प्रसन्न शिंदे, त्याची पत्नी आशा शिंदे , शिक्षिका दर्शना पंडित आणि कामगार प्रकाश गुप्ता यांचा समावेश आहे. मात्र या घटनेने परिसरात आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

वयोवृद्ध जोडप्याचे एसटी प्रवासादरम्यान 9 लाखाचे दागिने चोरीला, पोलीस ठाण्यात तक्रार

बीडहून परळी आणि परळीहून सोनपेठ येथे एसटीने प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध जोडप्याचे प्रवासादरम्यान नऊ लाखाचे दागिने चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.माधुरी व त्यांचे पती सूर्यकांत परळकर हे छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या मुलीकडे गेले होते. संभाजीनगर येथून एस.टी. बसने बीडला आले. बीड येथून सोनपेठला जाण्यासाठी बीड - परळी बसने दुपारी 12. वा. बीड येथून निघून परळीला दुपारी सव्वा दोन ते आडीच वा.सुमारास बस स्थानकात आले. सोनपेठची बस गेली होती म्हणुन त्यांनी परळी बस स्थानकावर उसाचा रस घेतला व दुपारी 3 वाजताच्या सुमारास परळी - सोनपेठ बसने सोनपेठला गेले. घरी गेल्यावर बॅग तपासली असता बॅग मधील लाल पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने दिसले नाहीत.

या पर्समध्ये सहा तोळे वजन असलेले 3 लाख रूपयाची एक मोहन माळ, सहा तोळे वजन असलेले 3 लाख रुपयांचे एक सोन्याची गंठण,चार तोळे वजनाचा 2 लाख रुपयांचा एक लाल खडा असलेला नेकलेस आणि दोन तोळे वजनाची 1 लाख रुपयांची जुनी बोरमाळ असे एकुण 9 लाख रुपये  किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे फिर्यादीद म्हटले आहे.

याप्रकरणी माधुरी सुर्यकांत परळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.परळी संभाजीनगर पोलिसांना याबाबत माहिती विचारले असता त्यांनी हा गुन्हा सोनपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग केल्याची माहिती दिली.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
SMAT : अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर रोमांचक विजय
अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर विजय
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Embed widget