Tigress Attack in Chandrapur : चंद्रपूर शहरातूनएकअतिशयधक्कादायकबातमीसमोरआलीआहे. वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा दुर्दैवी मृत्यू (Tigress Attack) झाल्याचीघटनाघडलीआहे. चंद्रपूरजिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही-पवनपार परिसरातील (Gunjewahi-Pawanpar area) हि घटना घडलीआहे. मिळालेल्यामाहितीनुसार, तेंदुपत्ता तोडण्यासाठी 13 महिला जंगलात गेल्या असताना यावेळी दबाधरून बसलेल्या वाघाने हल्लाकेला. याहल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतआहे. (Tigress Attack in Chandrapur)
Tigress Attack in Chandrapur :एकाच वेळी चार महिलांच्या मृत्यूची राज्यातील पहिली घटना असण्याची शक्यता
दरम्यान, घटनेचीमाहितीमिळताच वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखलझालेआहे. याप्रकरणाचासविस्तरतपास झाल्यावर याबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माणझालाअसून वाघाच्या हल्ल्यात एकाच वेळी चार महिलांच्या मृत्यूची जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील ही पहिली घटना असण्याची शक्यता वर्तवलीझालेतआहे.
मिळालेल्यामाहितीनुसार, वाघाच्या हल्ल्याची ही घटना गुंजेवाही-पवनपार या मार्गावर असलेल्या खैरीचक परिसरातील जंगलात घडली असून सर्व महिला या गुंजेवाही या गावातील रहिवासी आहे. त्यासर्वमहिला भट्टी मोहल्ला वॉर्ड क्रमांक 1 येथे राहतात. तर मृतांची नावे खालील प्रमाणे आहेत
1) कविता दादाजी मोहुर्ले - 45
2) अनिता दादाजी मोहुर्ले - 46
3) संगीता संतोष चौधरी - 40
4) सुनीता कौशिक मोहुर्ले - 35
Bhnadara News: भंडाऱ्याच्या जवाहरनगर आयुध निर्माणी परिसरात वाघाचा थरार! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणीच्या परिसरात दिवसाचं वाघाचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. आयुध निर्मितीच्या मुख्य मार्गालगत हा वाघ आला. सध्या तापमान 45 अंश सेल्सिअसच्या घरात पोहचला असून मानवासह प्राण्यांचीही प्रचंड उकाड्यामुळे ससेहोलपट होत आहे. शरीराची होणारी लाहीलाही मिटविण्यासाठी हा वाघ पाण्याचा छोटासा स्रोत असलेल्या जागेवर बस्तान मांडून आराम करीत असल्याचा येथून जाणाऱ्या एका नागरिकानं हा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केला असून तो सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतोय. आयुध निर्माणी परिसरासोबतचं पेवठा ते जवाहरनगर मार्ग आणि डीएससी पलटून टी-पॉईंट उतार (घोडदौड) कोंडी मार्गावरही अनेक नागरिकांना हा वाघ दिसला. हा परिसर नेहमीच वर्दळीचा असल्यानं रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची वाघाला पाहून घाबरगुंडी उडाली. 15 दिवसांपूर्वी या परिसरात मध्यरात्री वाघ बघायला मिळाला होता. त्यानंतर आता दिवसाचं वाघाचं दर्शन झाल्यानं वन विभागानं या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
