Bihar Crime : बोगदा खोदून चोरलं रेल्वेचं इंजिन, चोरट्यांची अनोखी शक्कल; पोलीसही हैराण

Thieves Steal Railway Engine : बिहारमध्ये चोरट्यांनी बोगदा खोदून रेल्वे इंजिन चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी इंजिनाचे भाग वेगवेगळे करुन ते लंपास केले.

Continues below advertisement

Railway Engine Theft : बिहारमध्ये एक विचित्र चोरीची घटना समोर आली आहे. ही चोरीची घटना समोर आल्यावर पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. चोरट्यांनी चक्क बोगदा खोदून रेल्वे इंजिन ( Thieves Steal Railway Engine ) चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी इंजिनाचे भाग वेगवेगळे करुन ते लंपास केले. ही घटना समोर आल्यावर सर्वांच्याच भूवया उंचावल्या. चोरट्यांनी बिहारमध्ये बरौनीपासून मुजफ्फरपूर पर्यंत बोगदा खोदला आणि रेल्वे इंजिनाचे भाग वेगवेगळे करुन संपूर्ण रेल्वे इंजिन चोरलं. गेल्या आठवड्यात एका चोरट्यांच्या टोळीने बरौनी येथील गरहारा रेल्वे यार्डमध्ये दुरुस्तीसाठी आणलेल्या ट्रेनचे संपूर्ण डिझेल इंजिनच चोरून नेलं. 

Continues below advertisement

अलिकडेच रोहतास येथे 500 टन वजनाचा लोखंडी पूल चोरल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी आता बोगदा खोदून रेल्वेच पूर्ण इंजिन गायब केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूरमधील एका भंगाराच्या दुकानातून इंजिनाचे भाग जप्त करण्यात आले आहे. हे इंजिनाचे पार्ट पोत्यांमध्ये भरलेले होते. 

बोगदा खोदून चोरलं रेल्वेचं इंजिन

याप्रकरणी तपास करत पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान चोरट्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर, पोलिसांनी मुझफ्फरपूरच्या प्रभात कॉलनीमध्ये असलेल्या एका भंगार गोदामातून इंजिनचे भाग भरलेल्या 13 पोती जप्त केल्या. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना यार्डजवळ एक बोगदा सापडला, ज्यातून चोरटे रेल्वे यार्डमध्ये यायचे आणि इंजिनचे पार्ट चोरून ते पोत्यात भरून घएऊन जायचे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात एका टोळीने बरौनी (बेगुसराय जिल्हा) येथील गरहरा रेल्वे यार्ड येथे दुरुस्तीसाठी आणलेल्या ट्रेनचे संपूर्ण डिझेल इंजिन चोरून नेलं. चोरट्यांने रेल्वे इंजिनाचे भाग वेगवेगळे करून ते चोरले. पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, मुझफ्फरपूर येथीला एका भंगाराच्या गोदामातून रेल्वे इंजिनचे भाग असलेली 13 पोती जप्त केली.

रेल्वे इंजिन चोरी प्रकरणात खळबळजनक खुलासा झाल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. रेल्वे इंजिन चोरी प्रकरणी बरौनी येथील गधरा रेल्वे यार्डातील इलेक्ट्रिक लोको शेड परिसरातून बोगद्याचे फोटोही समोर आले आहेत. मात्र, घटनास्थळी प्रसारमाध्यमांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. लोकोमोटिव्ह शेडच्या बाउंड्री वॉलखालील माती खोदून चोरट्यांनी बोगदा तयार केला. यानंतर रेल्वे इंजिनाचे भाग वेगवेगळे करून ते पोत्यात भरून चोरले. या प्रकरणात, 7 नोव्हेंबर रोजी एका चोराला आरपीएफने चोरी करताना रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. चोरीनंतर मुझफ्फरपूरमध्ये अटक करण्यात आलेल्या चोरट्याने दिलेल्या माहितीच्या छापा टाकून पोलिसांमी चोरलेलं रेल्वे इंजिन जप्त केलं.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola