एक्स्प्लोर

Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!

Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर मोठी राजकीय खळबळ उडाली.

Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या हत्येनंतर मोठी राजकीय खळबळ उडाली. पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या असतानाच यंत्रणांच्या हाती मोठं यश आलं आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा क्राईम ब्रान्चच्या हाती लागलं आहे. एक पिस्तुल आणि मोबाईल क्राईम ब्रान्चनं हस्तगत केलंय. मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा जवळ हे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. (Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case)

प्रदीप पुणेकर हत्या प्रकरणात आरोपी नितेश पवार याने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि गावठी पिस्तूल पोलिसांनी कर्नाळा येथून हस्तगत केले आहे. खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करत आरोपीसह जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.तसेच, या गुन्ह्यात आरोपीने वापरलेली अल्टो कारदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. सदर अल्टो कार एमजीएम रुग्णालयापासून काही अंतरावर उभी करून ठेवण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case)

कर्नाळा जंगलात काय घडलं? (Thane Pradeep Purnekar Case)

पूर्णेकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं रायगड जिल्ह्यातील कर्नाळा जंगलात फेकलेलं हे पिस्तूल आणि आरोपीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी निखिल यादव आणि आरोपी नितेश पवार उर्फ भावड्या यांच्यावर सदर प्रकरणातील हत्यारे लपवण्याची जबाबदारी होती. हत्या केल्यानंतर आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली, अनोळखी हल्लेखोर, नितेश पवार उर्फ भावड्या आणि निखिल यादव हे अल्टो गाडीतून फरार झाले होते. ⁠कल्याण फाटा येथे आरोपी निखिल यादव आणि नितेश पवार उर्फ भावड्या अल्टो गाडीतून उतरले आणि ⁠तिथून ते मुंबई - गोवा हायवेच्या दिशेने निघाले रस्त्यात त्यांनी कर्नाळा येथे हत्यारं लपवली आणि पुढे गेले होते. आता हीच हत्यारं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ ठाण्यात शांततापूर्ण मोर्चा- (Shivsena UBT Pradeep Purnekar)

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ विरोधकांकडून 9 ऑक्टोबरला ठाण्यात शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार आहे, ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादीही मोर्चात सहभागी होणार आहे, ठाणे महापालिका आयुक्त कार्यालयापासून पोलीस आयुक्तालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे, ठाण्यातील वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्ज माफियांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्णेकर हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी एसआयटी स्थापन केली असून आतापर्यंत आरोपींना अटक आणि वाहनांची जप्ती करण्यात आली आहे. पूर्णेकर हत्या प्रकरणात सुपारी देऊन नियोजित हत्या झाल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केलाय, तर आरोपींच्या संपर्काचा सीडीआर तपासात महत्त्वाचा ठरला आहे.

नेमकं प्रकरण काय? (Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case)

ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर 29 सप्टेंबर रोजी रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास पाच हल्लेखोरांनी शिरुन पिस्तुलमधून सात राऊंड फायर केले. त्यापैकी चार गोळ्या प्रदीप पूर्णेकर यांच्या शरीरात घुसल्या. पूर्णेकर यांचे कार्यकर्ते कार्यालयात पोहोचले तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांचा तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

संबंधित बातमी:

Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: एक तरुणी दोन मुलांसोबत खोलीत आढळली अन्...; प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur News: पूर्ण झालेल्या विहिरीचे मोजमाप सुरू असताना मोठा अनर्थ घडला; ढिगाऱ्याखाली चार मजूर अडकले; एकाचाही शोध लागेना, NDRF टीमच्या मदतीची प्रतीक्षा
पूर्ण झालेल्या विहिरीचे मोजमाप सुरू असताना मोठा अनर्थ घडला; ढिगाऱ्याखाली चार मजूर अडकले; एकाचाही शोध लागेना, NDRF टीमच्या मदतीची प्रतीक्षा
Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
लातूरमध्ये भीषण अपघाताची घटना; कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी
लातूरमध्ये भीषण अपघाताची घटना; कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी
Karad Crime: इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याने राहत्या प्लॅटमध्ये आयुष्य संपवलं, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, शेवटच्या ‘त्या’ चिठ्ठीनं खळबळ, कराडमध्ये नेमकं काय घडलं?
इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याने राहत्या प्लॅटमध्ये आयुष्य संपवलं, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, शेवटच्या ‘त्या’ चिठ्ठीनं खळबळ, कराडमध्ये नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar Trademark: रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क; वापरल्यास कारवाईचा इशारा, एपस्टीन फाइल्सच्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क; वापरल्यास कारवाईचा इशारा, एपस्टीन फाइल्सच्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
मुंबईतील CSMT स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी, ई-मेल येताच पोलिसांकडून डॉगस्कॉडसह पाहणी
मुंबईतील CSMT स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी, ई-मेल येताच पोलिसांकडून डॉगस्कॉडसह पाहणी
PM Modi: 'जनजातीय गौरव दिन राष्ट्रीय उत्सव, पण पूर्वी आपले सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे', आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटींचं बजेट, गडचिरोलीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
'जनजातीय गौरव दिन राष्ट्रीय उत्सव, पण पूर्वी आपले सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे', आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटींचं बजेट, गडचिरोलीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
लातूरमध्ये भीषण अपघाताची घटना; कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी
लातूरमध्ये भीषण अपघाताची घटना; कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी
IndiGo Flight : पुणे विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्यानंतर '6E 0623' विमानाचे सुरक्षित लँडिंग, 192 जण सुखरूप, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्यानंतर '6E 0623' विमानाचे सुरक्षित लँडिंग, 192 जण सुखरूप, नेमकं काय घडलं?
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Bhandara News: लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
Embed widget