Thane News : मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (Sanjay Gandhi National Park) येऊर परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिथे एका माकडाला स्टीलच्या (Monkey Injured by Arrow) बाणाने मारण्यात आले आहे. बाणाच्या स्वरूपामुळे हे स्पष्ट होते की, ते व्यावसायिक धनुर्विद्या उपकरणांचा वापर करून व्यावसायिक तिरंदाजाने चालवला असावा. यामुळे या संरक्षित वनक्षेत्रात किंवा त्याच्या आसपास कार्यरत असलेल्या बेकायदेशीर आस्थापनांच्या आणि तेथील गैरप्रकारांबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. बेकायदेशीरपणे चालणाऱ्या स्टड फार्म आणि टर्फ्स कथितरित्या घोडेस्वारी, तिरंदाजी यांसारख्य साहसी खेळांचे प्रशिक्षण देतात. तसेच येथे स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यामुळेच माकडाला बाण मारला असल्याचे समोर आले असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, येऊर परिक्षेत्रातील गतविधींवर कारवाई करण्याचीमागणीआताकेलीजातआहे. तर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कार्यकारी सदस्य रोहित जोशी यांनी या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. जोशी म्हणाले, "हे एक अमानुष कृत्य आहे आणि आमच्या संरक्षित जंगलांतील वन्यजीवांवर थेट हल्ला आहे. ज्याने कोणी हे कृत्य केले असेल त्याला शोधून दंडित करणारच, इतकेच नाही तर समितीतील सर्व भागधारक, वन विभाग, ठाणे महानगरपालिका, ठाणे पोलीस , स्थानिकांच्या सहकार्याने येथील सर्व बेकायदेशीर आस्थापनाना आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. असेहीतेम्हणाले.
Thane News : नेमकंप्रकरणकाय? (Monkey Injured by Arrow)
ठाणे परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) जवळ धनुष्यबाणाने जखमी झालेल्या माकडाची धक्कादायक घटना उघड झालीय. स्थानिक नागरिकाने SGNP आणि RAWW (Resqink Association for Wildlife Welfare) यांच्या हेल्पलाईनवर कॉल करून यासंदर्भात माहिती दिली. झाडावर बसलेल्या माकडाच्या श्रोणी (pelvic) भागात बाण आरपार घुसलेला यावेळीआढळूनआला. RAWW च्या वन्यजीव बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत माकडाची सुरक्षित सुटका केली. तर जखमी माकडाला तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले. उपचारांची जबाबदारी असोसिएट व्हेटरनरी डॉ. प्रीती साठे यांच्याकडे होती.
Thane News : वापरण्यात आलेला बाण हा व्यावसायिक आर्चरीमधला?
दरम्यान, यावेळी माकडावर मोठी शस्त्रक्रिया होणार असून पुढील काही दिवस 24 तास देखरेखीत उपचार आणि पुनर्वसन होणार आहे. अशातचयाप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यातआलीआहे. तर वापरण्यात आलेला बाण हा व्यावसायिक आर्चरीमध्ये वापरला जाणारा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वनविभागाने तपास सुरू केला असून आरोपींवर कठोर कारवाईची शक्यता आहे.
