Thane Crime : ठाणे : डोंबिवलीतील (Dombivli Crime) एका धक्कादायक प्रकारानं संपूर्ण ठाणे (Thane Crime) जिल्हा हादरला आहे. एका फळ विक्रेत्याच्या घृणास्पद कृत्यानं (Abominable Act of Fruit Seller) डोंबिवलीकरांची झोप उडाली आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) डोंबिवलीतील फळ विक्रेत्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फळ विक्रेता एका प्लास्टिकच्या पिशवीत लघुशंका करताना दिसत आहे. एवढंच नाहीतर, त्यानंतर तो हात न धुता, त्याच हातांनी ग्राहकांना फळं विकताना दिसतोय. फळ विक्रेत्याच्या घृणास्पद कृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये फळ विक्रेत्याचे घृणास्पद कृत्य उघडकीस आलं आहे. प्लॅस्टिकच्या पिशवीत लघवी केल्यानंतर आरोपी फळविक्रेता हात न धुता फळे विकू लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने ती बॅगही गाडीवर ठेवली. त्याच्या या गैरकृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
नेमकं घडलं काय?
डोंबिवलीतील निलजे परिसरात एका फळ विक्रेत्यानं प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करून त्याच हातानं ग्राहकांना फळं विकण्यास सुरुवात केली. या फळ विक्रेत्याचा लघवी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फळ विक्रेत्याचे हे घृणास्पद कृत्य उघडकीस आल्यानंतर मानपाडा पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओची चौकशी करून फळ विक्रेत्याला ताब्यात घेतलं आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अली खान असं या 20 वर्षीय फळ विक्रेत्याचं नाव आहे. हा व्हिडीओ निलजे भागातील आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 271 (धोकादायक रोगाचा संसर्ग पसरण्याची शक्यता, निष्काळजीपणा), 272 आणि 296 (अश्लीलता) अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर डोंबिवलीकरांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे.
दरम्यान, यापूर्वी अशी घटना उत्तर प्रदेशातून समोर आली होती. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक दुकानदार लोकांना ज्यूसमध्ये लघवी मिसळून ते प्यायला लावत असे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी ज्यूस विक्रेत्याला आणि त्याच्या 15 वर्षीय मुलाला अटक केली होती. पोलिसांनी त्याच्या दुकानातून लघवीनं भरलेला एक कंटेनरही जप्त केला होता.
पाहा व्हिडीओ : Dombivali Viral Video : फळ विक्रेत्याची प्लास्टिकच्या पिशवीत लघवी, त्याच हाताने फळाची विक्री