कोलकाता: भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ (Suvendu Adhikari PA Shot Dead) यांची बुधवारी (६ मे) रात्री कोलकात्याच्या बाह्य भागात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काही तासांतच घडलेल्या या घटनेमुळे (Suvendu Adhikari PA Shot Dead) राजकीय वातावरण तापले असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ यांच्या हत्येवर भाजप खासदार राहुल सिन्हा म्हणाले, "मी यापूर्वीही म्हटले आहे की टीएमसीची राजकीय मान्यता काढून घेतली पाहिजे. ते निवडणूक हरले आणि आता ममता बॅनर्जी म्हणत आहेत की, त्या राजीनामा देणार नाहीत. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की काहीही कामाचे नाही, तेव्हा त्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या पीएला लक्ष्य केले आणि त्यांची हत्या घडवून आणली. या घटनेची चौकशी सुरू आहे आणि मला आशा आहे की यामागील व्यक्ती लवकरच पकडली जाईल."(Suvendu Adhikari PA Shot Dead)

Suvendu Adhikari PA Shot Dead : नेमकी घटना काय?

उत्तर २४ परगना जिल्ह्यातील मध्यमग्राममधील दोहरिया परिसरात ही घटना घडली. सुवेंदु अधिकारींचे सहाय्यक चंद्रनाथ रथ हे कारने जात असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या कारचा पाठलाग केला. कार थांबवून हल्लेखोरांनी अगदी जवळून चंद्रनाथ यांच्यावर गोळ्या झाडल्या. यावेळी रथ हे चालकाच्या बाजूच्या पुढच्या सीटवर बसले होते. त्यांच्या छातीत आणि पोटात अनेक गोळ्या लागल्या. या हल्ल्यात रथ यांचा चालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Suvendu Adhikari PA Shot Dead :तपासाबाबत पोलिसांची माहिती

राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) सिद्धनाथ गुप्ता यांनी सांगितले की, "आम्ही तपास सुरू केला असून गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली आहे. या गाडीची नंबर प्लेट बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळावरून रिकामी काडतुसे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे."

या हत्येनंतर भाजपने तृणमूल काँग्रेसवर (TMC) घणाघाती टीका केली आहे.भाजप नेते अर्जुन सिंह यांनी म्हटलं की, "अभिषेक बॅनर्जी यांनीच या हत्येचा कट रचला आहे. आपण सत्तेत नसलो तरीही आपण ताकदवान आहोत, असा संदेश त्यांना यातून द्यायचा आहे, पण या सगळ्याचं त्यांना उत्तर मिळेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे", तर भाजप खासदार राहुल सिन्हा यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, "टीएमसीची राजकीय मान्यताच रद्द केली पाहिजे. निवडणुका हरल्यानंतर आता ते सुवेंदु अधिकारींच्या माणसांना लक्ष्य करत आहेत." तर भाजप आमदार दिलीप घोष यांनी म्हटलं की, "अशा हिंसाचाराच्या घटना थांबल्या पाहिजेत. टीएमसीच्या अंतर्गत वादातून भाजप कार्यकर्त्यांवर अत्याचार होत आहेत."

४ मे रोजी बंगाल निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सुवेंदु अधिकारी यांनी शांततेचे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्याच पीएच्या हत्येमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये चंद्रनाथ आणि चालकाव्यतिरिक्त 'मिंटू' नावाचा त्यांचा एक जवळचा व्यक्तीही मागे बसलेला होता. पोलीस आता या सर्व बाजूने अधिक तपास करत आहेत.

Suvendu Adhikari PA Shot Dead : शुभेंदू अधिकारी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले

४ मे रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात हिंसाचाराच्या अनेक घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी शुभेंदू अधिकारी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले होते. हिंसाचारात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. भाजपचा कोणताही नेता किंवा कार्यकर्ता हिंसाचारात आढळल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

Suvendu Adhikari PA Shot Dead : त्यांच्या छातीत अनेक गोळ्या लागल्या होत्या

रुग्णालयातील एका डॉक्टरांनी सांगितले की, “चंद्रनाथ रथ यांना मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्या छातीत अनेक गोळ्या लागल्या होत्या, तर एक गोळी पोटातही लागली होती.” या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. गोळीबार करणाऱ्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Suvendu Adhikari PA Shot Dead : गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी जप्त करण्यात आली

पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक सिद्धनाथ गुप्ता यांनी सांगितले की, “या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी जप्त करण्यात आली असून तिच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड केल्याचे समोर आले आहे. वापरण्यात आलेली नंबर प्लेट सिलिगुडीतील एका वाहनाची असली तरी ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळावरून रिकामे आणि जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.”

Suvendu Adhikari PA Shot Dead : हल्लेखोरांनी त्यांच्या कारचा पाठलाग करून....

ही घटना उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम परिसरातील दोहरिया येथे घडली. चंद्रनाथ रथ यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी जवळून गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांच्या कारचा पाठलाग करून वाहन अडवले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्यावेळी चंद्रनाथ रथ हे चालकाच्या शेजारी पुढील सीटवर बसले होते. या हल्ल्यात चालकही जखमी झाला असून त्याच्यावर कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.