Kolkata Law College Case :कोलकातायेथील साउथ कोलकाता लॉ कॉलेज (South Kolkata Law College) प्रकरणात पोलिसांनी 650 पानी चार्जशीट (Chargesheet) दाखल केली असून त्यामध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. चार्जशीटमध्ये नमूद केलं आहे की मुख्य आरोपी मनोजित मिश्रा (Manojit Mishra) याने पीडितेचे अनेक व्हिडीओ (Videos) तयार करून तिला ब्लॅकमेल (Blackmail) केला. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीत (Medical Report) बलात्कार (Rape) झाल्याचे स्पष्ट झाले असून आरोपीचा डीएनए (DNA Test) फॉरेन्सिक पुराव्यांशी जुळला आहे.
Kolkata Law College Rape Case : नेमकं काय घडलं?
कोलकात्यात 25 जून रोजी, लॉ कॉलेजच्या फर्स्ट सेमिस्टरच्या विद्यार्थिनीवर मुख्य आरोपी मनोजित मिश्रा आणि सह-आरोपी जैब अहमद (Jaib Ahmed), प्रमित मुखर्जी (Pramit Mukherjee) यांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. या प्रकरणातील चौथा आरोपी सुरक्षा रक्षक पिनाकी बनर्जी (Pinaki Banerjee) असून त्याच्याविरुद्धही केस नोंदवली आहे.
सीसीटीव्ही पुरावे मिळाले (CCTV Evidence)
पोलिसांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) हाती लागले आहे, ज्यात आरोपी पीडितेला मारहाण करण्यात आली आणि तिचे अपहरण केल्याचं समोर आलं. शिवाय आरोपींच्या मोबाईलमधून पीडितेचे अनेक अश्लील व्हिडीओ (Obscene Videos) मिळाले आहेत. ते व्हिडीओ लॉ कॉलेजच्या खोलीतील एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून चोरून चित्रीत (Hidden Camera) करण्यात आले होते.
मोबाईल लोकेशन आणि आवाज जुळले (Mobile Location & Voice Match)
पोलिसांच्या तपासात आरोपींचे मोबाईल लोकेशन (Mobile Location) घटनास्थळी आढळली. तसेच जप्त केलेल्या व्हिडीओंमध्ये रेकॉर्ड झालेल्या आवाजांचा (Voice Recording) मेळ आरोपींशी बसतो, असे चार्जशीटमध्ये म्हटले आहे.
सुरक्षा रक्षकाची भूमिका (Law College Security Guard’s Role)
या प्रकरणात लॉ कॉलेजच्या सुरक्षारक्षकावर चौथा आरोपी म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या चार्जशीटनुसार, सुरक्षा रक्षकाने या घटनेची माहिती पोलिसांना देण्याऐवजी खोली बाहेरून बंद केली. त्यामुळे त्याला सह-आरोपींच्या यादीत समाविष्ट केले गेले आहे.
कॉलेज प्रशासनाची कारवाई (College Action)
या प्रकरणानंतर कॉलेज प्रशासनाने आरोपी मनोजित मिश्रा, जो 2024 पासून तात्पुरता कर्मचारी म्हणून काम करत होता, त्याला तात्काळ कामावरुन कमी केलं. त्याच्यासोबत सामील असलेल्या आरोपी विद्यार्थ्यांनाही कॉलेजमधून काढून टाकण्यात आले आहे.
ही बातमी वाचा:
