सोनमने लग्न न करण्यासाठी धमकी दिली होती का?पोलिसांनी कुटुंबियांना विचारले हे 10 प्रश्न
मंगळवारी (17जून) पोलिसांनी हत्येत वापरलेले दुसरे शस्त्रदेखील जप्त केले. राजा रघुवंशीवर दोन शस्त्रांनी हल्ला करण्यात आला आणि मृतदेह दरीत फेकून देण्यात आला.

Sonam Raghuwanshi: मेघालयात मधुचंद्रासाठी गेलेल्या इंदौरच्या 29 वर्षीय राजा रघुवंशीच्या हत्येच्या चौकशीत गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. शिलाँग पोलिसांनी राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपी पत्नी सोनम रघुवंशीच्या कुटुंबियांची चौकशी केली आहे. पोलिसांनी सोनमचे पालक आणि भाऊ गोविंद यांची चौकशी केली.हत्येपूर्वी, लग्नानंतर, लग्नाआधी सोनमच्या वर्तनाविषयी सोनमच्या घरच्यांची चौकशी करण्यात आली. सोनमच्या वागण्या-बोलण्याबद्दल आणि तिच्या कामाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. सोनमच्या घरात ठेवलेल्या वस्तूंचीही तपासणी करण्यात आली. गोविंद रघुवंशी म्हणाले की, तो संजय वर्मा नावाच्या कोणालाही ओळखत नाही.
मेघालय पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनम रघुवंशीने तिचा गुन्हा कबूल केला आहे. सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहासोबत मिळून तिच्या पतीची हत्या केली. मंगळवारी (17जून) पोलिसांनी हत्येत वापरलेले दुसरे शस्त्रदेखील जप्त केले. राजा रघुवंशीवर दोन शस्त्रांनी हल्ला करण्यात आला आणि मृतदेह दरीत फेकून देण्यात आला.
सोनमच्या कुटुंबाला विचारले हे प्रश्न
- सोनमचे वर्तन कसे होते?
- लग्नापूर्वी आणि नंतर सोनमचे वर्तन कसे होते?
- राजाच्या घरून आल्यानंतर सोनमच्या वागण्यात काही फरक जाणवला का?
- सोनमने कोणासोबत फोनवर दीर्घ संभाषण केले?
- सोनम आणि राजच्या प्रेमप्रकरणाचे काही संकेत होते का?
- सोनमने तिच्या आईला लग्न न करण्यासाठी कसली धमकी दिली होती का?
- सोनम शिलाँगला जाणार आहे हे तुम्हाला कधी कळले?
- राज व्यतिरिक्त, इतर आरोपी घरी आले होते का?
- सोनमच्या खात्यात कोणाचे पैसे होते आणि ते कुठून आले?
- संजय वर्मा आणि जितेंद्र रघुवंशी यांच्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
राजा आणि सोनम प्रकरणाची टाइमलाइन
11 May: राजा आणि सोनमचं लग्न इंदूरमध्ये पार पडलं.
21 May: नवविवाहित जोडपं शिलाँगला पोहोचलं आणि बालाजी गेस्ट हाऊसमध्ये थांबले.
22 May: शिलाँगच्या कीटिंग रोडवरून त्यांनी एक स्कूटी भाड्याने घेतली आणि सोहराकडे रवाना झाले.
23 May: नोंगरियाट गावाजवळ ट्रेकिंग करताना स्थानिक मार्गदर्शकाने दोघांना पाहिलं – राजाचं जिवंत शेवटचं दर्शन.
24 May: सोहरीरिम भागात स्कूटी बेवारस अवस्थेत सापडली.
2 June: वेई सावडोंग धबधब्याजवळील खोल दरीत राजाचा कुजलेला मृतदेह आढळून आला.
7-8 June: या प्रकरणात अटक झाली. पुढे सोनमने उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये आत्मसमर्पण केलं.
हेही वाचा:
शॉकिंग ! सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भीषण दुर्घटना, हवेतूनच पाळणा तुटला; एकाचा मृत्यू, 2 जखमी























