Sonam Raghuvanshi Case: इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून देशभरात मोठी चर्चा आहे .मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह या दोघांनी मिळून राजा रघुवंशी याच्या हत्येचा कट रचला होता .या हत्या प्रकरणाचा तपास मेघालय पोलिसांची एक विशेष टीम करत आहे . मेघालय पोलिसांच्या माहितीनुसार, सोनम आणि राज कुशवाह या दोघांनी त्यांच्या नात्याची कधीच कबुली दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी फेटाळली असून पुरेसे पुरावे असल्याने नार्को चाचणीची गरज नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे . नार्को विश्लेषण चाचणीचे निष्कर्ष न्यायालयातही ग्राह्य धरले जात नाहीत. दोन्ही आरोपींनी आधीच गुन्हा कबूल केल्याचं मेघालय पोलिसांनी सांगितलं .
राजा रघुवंशीच्या हत्येचा कारण काय ?
प्रेम संबंध आणि व्यवसायिक महत्त्वकांक्षा अशा दोन कारणांसाठी राजा रघुवंशी अडथळा ठरत असल्याने सोनम आणि राज कुशवाह या दोघांनी राजा रघुवंशीचा काटा काढण्याचे ठरवले .राज आणि सोनम यांचे प्रेम संबंध होते पण रूढी परंपरा आड येत असल्याने आई-वडील व इतरांची संमती मिळवायची होती .त्यामुळे त्यांनी राजापासून सुटका मिळवण्याचा प्लॅन केल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं .
मेघालयातील शिलॉंगमध्ये राजा रघुवंशीचा खून केल्यानंतर बेपत्ता झालेल्या सोनम रघुवंशी ने उत्तर प्रदेशातील गाझीपुरमध्ये गेली .यावेळी ती इंदूरमधील एका फ्लॅटमध्ये राहिली . मेघालय पोलीस या फ्लॅटची चौकशी करत आहे .हा फ्लॅट लोकेंद्र तोमर या व्यक्तीचा असल्याचा समोर आला आहे .सोनमच्या बॅग मध्ये एक देशी पिस्तूल तिचा फोनवर आज्याचे दागिने आणि पाच लाख रुपयांची रोख रक्कम असल्याचा आरोप आहे .हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा पोलिसांना संशय आहे . राजा रघुवंशी च्या हत्येचे कारण केवळ पैसा होता हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही .सोनम रघुवंशीने हत्येचा कट रचल्याने हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे .मेघालय पोलीस या प्रकरणातील सर्व शक्यतांचा कसून तपास करत आहेत .
मधुचंद्रासाठी नेलं अन् राजा रघुवंशीला संपवलं
सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी भव्य लग्नानंतर सुमारे नऊ दिवसांनी, सोनम रघुवंशी आणि तिचा पती त्यांच्या हनिमूनसाठी मेघालयला निघाले. 23 मे रोजी, दोघेही शिलाँगपासून सुमारे 65 किमी अंतरावर असलेल्या निसर्गरम्य डोंगराळ शहर सोहरा येथे बेपत्ता झाले. नंतर, 2 जून रोजी, राजा रघुवंशी यांचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळला. तपासात असे दिसून आले की हत्येनंतर सोनम राज्य सोडून पळून गेली आणि आसाम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातून प्रवास करून शेवटी इंदूरला पोहोचली.
हेही पहा