धक्कादायक! पंढरपूर तालुक्यात दोन अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलांनेच केला अत्याचार, गुन्हा दाखल
पंढरपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. 10 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
Solapur Pandharpur Crime News : पंढरपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. किराणा दुकानात चहा पाऊडर आणण्यास गेलेल्या 10 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर दुकानदाराच्या अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पंढरपूर तालुक्यात घडली आहे. यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत मुलींच्या पालकांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास यातील पिडीत 10 वर्षे वयाची मुलगी तिच्याच वयाच्या चुलत बहिणीसोबत घराजवळ असलेल्या किराणा दुकानात चहा पाऊडर आणण्यासाठी गेली होती. यावेळी सदर दुकानातील अल्पवयीन मुलाने दोघींना काहीतरी दाखवायचे आहे, असे म्हणत दुकानात ओढून नेले. त्या ठिकाणी त्याने पिडीतेवर लैंगिक अत्याचार केला. घाबरून या मुली ओरडू लागल्यानंतर त्याने तिला सोडले. घाबरलेल्या अवस्थेत दोघी मुली घरी आल्या आणि घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर ही तक्रार फिर्याद पिडीतेच्या आईने पोलिसात दिली आहे. पोलिसांनी तातडीने या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.
























