Solapur Suicide News : सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. दक्षिण सोलापूर (South Solapur) तालुक्यात दोन जिवलग मित्रांनी टोकाचं पाऊल उचलत जीवनयात्रा (Suicide News) संपवली. एका मित्राने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या मित्रानं टोकाचे पाऊल (Suicide) उचल्याची माहिती आहे. आपल्या मित्राचं अचानक असं आयुष्यातून निघून जाणं दुसऱ्या मित्राला सहन झालं नाही. या दुःखातू दुसऱ्या मित्राने हे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केलीय. (Solapur Suicide News)

Continues below advertisement

Suicide News: एकांतात शेतात जाऊन झाडाला दोर लावून संपवली जीवनयात्रा

मिळालेल्या माहितीनुसार, वांगी गावातील गोरख भोई आणि सुरेश भोई असे आत्महत्या केलेल्या दोन मित्रांची नावे आहे. गोरख भोई यांनी शुक्रवारी रात्री आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी गोरख भोई याचा अंत्यविधी सुरू असताना सुरेश भोईला हे दुःख सहन न झाल्याने तिथून निघून गेला. त्यांनतर सुरेश याने एकांतात शेतात जाऊन झाडाला दोर लटकून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती. दक्षिण सोलापुरातील मंद्रूप पोलीस ठाण्यात या दोन्ही आत्महत्याची स्वतंत्रपणे नोंद करण्यात आली आहे. गोरख आणि सुरेश या दोघांनीही आत्महत्या का केली? याचा तपास सध्या पोलीस करतायत. मात्र या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली असून दोन्हीं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Kolhapur: निवडणुकीसाठी आणि पतीच्या व्यवसायाकरता सासऱ्याकडून पैशाचा तगादा, सुनेचं टोकाचं पाऊल

दरम्यान अशीच एक दुर्दैवी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडमध्ये घडलीय. निवडणुकीसाठी आणि पतीच्या व्यवसायाकरता सासऱ्याने दहा लाख मागितल्याने सुनेने आत्महत्या केलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडमध्ये हि धक्कादायक घटना घडलीय. कौसर गरगरे असं सुनेचे नाव आहे. आत्महत्येला प्रवृत्ती केल्याप्रकरणी सासरा, सासु, पती आणि जाऊ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. पती इंजमाम राजमहंमद गरगरे (वय 31) आणि जाऊ समिना इलहान गरगरे (वय 28, दोघेही रा. कुरुंदवाड) यांना या प्रकरणी अटक केली आहे.

Continues below advertisement

सासू मुमताज गरगरे व सासरा राजमहंमद गरगरे यांना मात्र अद्याप अटक केली नसल्याची माहिती आहे. तर माहेरच्या लोकांनी आत्महत्येबाबत शंका आल्याने महिलेच्या भावाने कुरुंदवाड पोलिसात तक्रार दिलीय. पुढे आलेल्या माहितीनुसार, पतीच्या व्यवसायाकरिता व सासऱ्याच्या निवडणूक खर्चासाठी दहा लाख रुपये घेऊन ये, अशा मागणीचा तगादा लावून बहिणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला, असा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या