Solapur Crime news: आईशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून सोलापूरमध्ये एका तरुणाने त्याचा मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोहोळ तालुक्यातील सौंदणे गावात ही घटना घडली. नेताजी तानाजी नामदे असे मृत तरुणाचे नाव आहे. विकास मारुती गुरव या त्याच्या मित्रानेच त्याचा खून केला. विकास गुरव याला नेताजी नामदे याचे आपल्या आपल्या आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे विकासच्या डोक्यात राग धुमसत होता. याचे पर्यवसान नेताजीच्या हत्येत झाले.
नेताजी नामदे हा घरातून 24 मे पासून बेपत्ता होता. तो दळण आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र, घरी परतलाच नव्हता. त्यामुळे नेताजीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी नेताजी नामदे याचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. तपासादरम्यान चार ते पाच दिवसांनी पोलिसांना त्याच्या व्हॉटसअॅपवरील माहिती मिळाली. व्हॉटसअॅप चॅटवरुन पोलिसांना विकास गुरव याचा संशय आला. पोलिसांनी विकासला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. पोलीसी खाक्या दाखवताच विकासने नेताजीची हत्या केल्याची कबुली दिली.
नेताजी याचे आपल्या आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आपल्याला वाटत होता, असे विकासने पोलिसांना सांगितले. त्यामुळेच आपण नेताजीही हत्या केली. त्यानंतर नेताजीचा मृतदेह शेतात नेऊन पुरला असे, विकासने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी विकासला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याल 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Bhandara Crime: पत्नीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठविणाऱ्या तरुणाच्या आईची पतीकडून हत्या
घरासमोर राहणाऱ्या तरुणांनं पत्नीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज आणि फोटो पाठवले होते. याचा राग अनावर झाल्यानं याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या इसमानं तरुणाच्या आईला लाठीकाठीनं बेदम मारहाण केली. अती रक्तस्त्रावामुळं उपचारादरम्यान महिलेचा लाखांदूर इथं मृत्यू झाला. ही थरारक घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैतपूर बारव्हा या गावात काल सायंकाळी घडली. सुनाबाई घटारे (४५) असं मृत महिलेचं नाव आहे. घटनेनंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या सोपान खोब्रागडे (३५) असं आरोपीचं नावं आहे. दोन कुटुंब एकमेकांच्या घरासमोर राहतात. त्यातील आरोपी हा पत्नीसोबत राहतो. तर, मृतक महिला आपल्या मुलासोबत राहते. मृतक महिलेच्या मुलानं आरोपीच्या पत्नीला अश्लील मेसेज आणि फोटो पाठविले होते. त्यातून महिलेच्या पतीनं तरुणाच्या आईची हत्या केली.
आणखी वाचा