Solapur Crime News सोलापूर:सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत माणुसकी सुन्न करणारी घटना घडली आहे. पतीच्या छळाला कंटाळलेल्या एका महिलेने आपल्या अवघ्या 10 महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून तिला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर या आईने सहा वर्षांच्या मोठ्या मुलीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आई… मी शाळा शिकते, मला मारू नकोस,” अशी आर्त विनवणी मुलीने करताच तिचा जीव बचावला. 

Continues below advertisement

धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी महिला मृत चिमुकलीला खांद्यावर घेऊन थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली आणि माझ्या पतीच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलीची हत्या केली आहे. मला अटक करा, अशी कबुली पोलिसांसमोर दिली. आरोपी महिलेचे नाव पूजा योगेश खुर्दामळे (वय 26) असून मृत चिमुकलीचे नाव शक्ती (वय 10 महिने) आहे. तर मोठी मुलगी तेजल (वय 6 वर्षे) सुदैवाने बचावली. मोठी मुलगी तेजल हिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. 

आई, मी शाळा शिकते, मला मारू नकोस, मुलीची आर्त हाक- (Solapur Crime News)

वडील कामावर गेल्यानंतर आईने आधी लहान बहिणीचा गळा दाबून तिला पाण्याच्या बादलीत बुडवले. त्यानंतर माझाही गळा दाबण्याचा आणि तोंडावर उशी दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, “आई, मी शाळा शिकते, मला मारू नकोस,” असे म्हणाल्यानंतर आईने मला सोडून दिले, अशी माहिती तेजलने पोलिसांना दिली. या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी पूजा खुर्दामळे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि १०९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Continues below advertisement

जालन्यात लहान मुलांच्या भांडणाचे हिंसक वळण, 18 वर्षीय तरुणाची हत्या- (Jalna Crime News)

जालना शहरात लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत 18 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील वाल्मीक नगर परिसरात दुपारच्या सुमारास किरकोळ वादातून सुरू झालेला संघर्ष काही वेळातच हिंसक वळणावर गेला. या हाणामारीदरम्यान लोखंडी रॉड आणि तलवारींचा वापर झाल्याची प्राथमिक माहितीसमोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सय्यद अहमद रियाज या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत दोन महिलाही जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केले असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून , खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Thane Crime News: लॉजमध्ये गेले, प्रियकराने प्रेसयीसोबत उशीने नको नको ते केले; ठाण्यातील हादरवणारी घटना