Solapur Crime News: सोलापुरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीसाठी व्हिडीओ बनवत पतीने केली आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. जाकीर अब्दुल्ल रज्जाक पटेल असे आत्महत्या केलेल्या 38 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. 

Continues below advertisement

नेमकं काय घडलं? (Solapur Crime News)

काल रात्री 8 च्या सुमारास जाकीर पटेल याने आपल्या राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी जाकीर पटेल यांचे पत्नीसोबत कौटुंबिक वाद झाले, याचं वादानंतर संध्याकाळी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. दरम्यान जाकीर पटेल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी 6 मिनिटांचा एक व्हिडीओ पत्नीच्या नावे बनवला आहे, हाच व्हिडीओ मृत जाकीर यांच्या कुटुंबीयांनी समोर आणला. 

जाकीर यांच्या पत्नीचे एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध- (Solapur Crime News)

जाकीर यांच्या पत्नीचे एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते, ह्या संबंधा संदर्भात जाब विचारल्यानेच जाकीर आणि त्यांच्या पत्नीत वाद झाले. तसेच पत्नीचे संबंध ज्या व्यक्ती बरोबर होते त्याने जाकीर पटेल यांना चापट मारली, हा अपमान सहन न झाल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप मृत जाकीर पटेल यांच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान जाकीर पटेल यांचे मृतदेह शवविच्छेदणासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Continues below advertisement

जाकीर पटेल शेवटच्या व्हिडीओमध्ये काय म्हणाला? (Solapur Crime News)

मी तुला फ्री करतोय...मी तुला आझाद करतोय....आता तुला बोलायला, अडवायला कोणी नसणार...मी तुला खूप समजवलं, परंतु तू कधीच ऐकलं नाही. त्यामुळे आज मी हे पाऊल उचलतोय, असं जाकीर पटेल व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. आधीही मी सांगितलेलं फोन नको करु त्याला...वारंवार समजावलेलं, मात्र तू ऐकलं नाही...पुढीही फोन करत होती, तू सगळ्यांच्या आयुष्याची वाट लावली, असंही जाकीर पटेल रडतरडत व्हिडीओमध्ये बोलत आहे. 

महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण, बीडमधील हादरवणारी घटना- (Beed Crime News)

बीड जिल्ह्यातून कायद्याची सुव्यवस्था धाब्यावर बसवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रंजेगाव येथे घरासमोर लघुशंकेला आणि जुगाराच्या अड्ड्याला आणि गुंडगिरीला विरोध केल्याच्या कारणावरून एका असहाय्य महिलेला नराधम गुंडांनी अमानुषपणे मारहाण केली. शरीरावर जखमा दिसू नयेत म्हणून या गुंडांनी महिलेच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप पीडित महिलेनं केला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मुख्य आरोपी निखिल आबूज आणि त्याच्या साथिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी वाल्मिक कराडचे समर्थक असून कराडसोबतचे त्यांचे फोटो आता व्हायरल होत आहेत. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम